विद्युत कर्मचाऱ्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:14+5:302021-07-11T04:07:14+5:30
नागपूर : लोकमत समूहाच्या वतीने महावितरणच्या गड्डीगोदाम येथील कार्यलयात शनिवारी झालेल्या शिबिरात विद्युत कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक जाणिवेचा परिचय ...
नागपूर : लोकमत समूहाच्या वतीने महावितरणच्या गड्डीगोदाम येथील कार्यलयात शनिवारी झालेल्या शिबिरात विद्युत कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक जाणिवेचा परिचय घडविला.
स्वतंत्रता संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लोकमत रक्ताचे नाते’ या उपक्रमांतर्गत राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. या अंतर्गत हे आयोजन पार पडले.
शिबिराचे उद्घाटन महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, रक्तदानासारखे महादान नाही. कोरोना संक्रमणाच्या काळात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाकाळात रुग्णांचे प्राण वाचविण्याचे काम यातून होणार असल्याने या उपक्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोकमतसोबत महावितरण या उपक्रमात सहभागी असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमप्रसंगी कार्यकारी अभियंता हेमराज ढोके, प्रफुल्ल लांडे, राजेश घाटोळे तसेच राहुल जीवतोडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय कोलते, संजय श्रंगारे, मानव संसाधन विभागाचे अमित पेढेकर, लेखा विभागाच्या अनुजा पात्रीकर, वर्कर्स फेडरेशनचे पी.व्ही. नायडू, जनसंपर्क अधिकारी अजित इगतपुरीकर, लता मंगेशकर रुग्णालयाच्या डॉ. मृणालिनी वानखेडे, डॉ. शुभा जैन, अमोल एदलाबादकर, नरेश शास्त्रकार, अरुण ठवकर, उमा रहाटे, राजेंद्र सवाईथुल, अंबादास गवळी आदी उपस्थित होते.