एनसीसी कॅडेटस्‌ने केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:13 AM2021-08-18T04:13:35+5:302021-08-18T04:13:35+5:30

रामटेक : शहरातील नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या वतीने स्वातंत्रदिनी (रविवार, दि. १५) रक्तदान ...

Blood donation by NCC cadets | एनसीसी कॅडेटस्‌ने केले रक्तदान

एनसीसी कॅडेटस्‌ने केले रक्तदान

Next

रामटेक : शहरातील नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या वतीने स्वातंत्रदिनी (रविवार, दि. १५) रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात १४ एनसीसी कॅडेस्‌नी रक्तदान केले. यावेळी त्यांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संगीता टक्कामोरे, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, लेफ्टनंट कर्नल दुर्गा बी. रॉय, अधिष्ठाता डॉ. महात्मे, सुभेदार चंदनसिंग, हवालदार राजेंद्रसिंह, सेवानिवृत्त सहायक फौजदार रमेश आंबिलकर, समर्पण ब्लड बँकेचे श्रीनिवास नखाते उपस्थित हाेते. समतादूत राजेश राठोड यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या रक्तगटाची तपासणी करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल दुर्गा बी. रॉय यांनी रक्तदान तर मोहन फाउंडेशनच्या प्रार्थना द्विवेदी यांनी अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. संचालन प्रा. सुनील कठाणे यांनी केले. प्रा. नरेश आंबिलकर यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. मनोज तेलरांधे, प्रा. नितीन घमंडी यांच्यासह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Blood donation by NCC cadets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.