कारागृहात रक्तदान महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:06 AM2021-07-12T04:06:15+5:302021-07-12T04:06:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर राज्यभरात ...

Blood donation in prison Mahayagya | कारागृहात रक्तदान महायज्ञ

कारागृहात रक्तदान महायज्ञ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर राज्यभरात सुरू असलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तसंकलन महायज्ञात रविवारी येथील मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी, कर्मचारी आणि रक्षकांनी सहभाग नोंदवला.

लोकमत आणि मध्यवर्ती कारागृह प्रशासनाच्यावतीने आयोजित हे रक्तदान शिबिर कारागृहाच्या प्रार्थना सभागृहात पार पडले. यावेळी कारागृहाचे अधिकारी, कर्मचारी आणि रक्षकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले.

स्व. श्री. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि दीप प्रज्वलित करून कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी लोकमतचे प्रादेशिक विभाग प्रमुख गणेश खवसे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी दीपा आदे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी कमलाकर मिराशे, विकास रचनलवार, देवराव आडे, तुरुंगाधिकारी दीपक भोसले, साळूंखे, संतोष कवार, शिपायी राजू हाते, योगेश पाटील, हटवादे गुरुजी, किशोर गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

---

त्यांनीही दाखवली तयारी

कारागृहात रक्तदान शिबिर पार पडत असल्याचे लक्षात आल्यामुळे अनेक कैद्यांनीही रक्तदान करण्याची तयारी दाखवली. मात्र, सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाल्याने ते शक्य झाले नाही.

Web Title: Blood donation in prison Mahayagya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.