रक्तदाते पोहोचले रक्तपेढीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:09 AM2021-07-07T04:09:19+5:302021-07-07T04:09:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर लोकमतने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर लोकमतने सुरू केलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय महारक्तदान अभियानास समाजातील अनेक घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे. त्याच शृंखलेत सोमवारी लोकमतने रक्तपेढी (ब्लड बँकेत) स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. लोकमतच्या या आवाहनाला दाद देत मोठ्या संख्येने तरुण-तरुणी, नागरिकांनी रक्तदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. मेयो ब्लड बँक, लाइफलाइन ब्लड बँक, जीवन ज्योती ब्लड बँक, डागा ब्लॅड बँक, जीएमसी सुपर स्पेशालिटी ब्लड बँक, जीएमसी ब्लड बँक, हेडगेवार ब्लड बँक, जीएसके ब्लड बँक, साईनाथ ब्लड बँक व आयुष ब्लड बँक येथे पोहोचून दात्यांनी आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान व्यक्त करत प्राणदानाची नवसंकल्पना रुजवली.
--------------
आज भिवापूर येथे रक्तदान
लोकमत व भाजप भिवापूर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी (दि. ६ जुलै) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत हे शिबिर होईल. शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याला माजी आ. सुधीर पारवे, किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस आनंद राऊत, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू राऊत, जिल्हा परिषद सदस्य शंकर डडमल, खरेदी-विक्रीचे अध्यक्ष चरणजीतसिंग अरोरा, बाजार समितीचे संचालक बाळू इंगोले, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री रोहित पारवे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संदीप निंबार्ते, माजी नगरसेवक आनंद गुप्ता उपस्थित राहतील. आयोजित शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन भाजपचे भिवापूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष हिमांशू अग्रवाल यांनी केले आहे.
-------------
आजचे रक्तदाते
ए पॉझिटिव्ह - गजानन भुसारी, वैभव राठी, तुषार लोखंडे, पंकज मडावी.
-------------
बी पॉझिटिव्ह - अभिलाष नंदागवळी, अजय जैस्वाल, रवींद्र निमजे, सुधीर करमकर, विनोद मिश्रा, गौरव चहांदे, मंगेश राणे, शेखर मौंदेकर.
------------
एबी पॉझिटिव्ह - राकेश भांडवलकर, वैभव रामटेके, हर्षल फुंडे, धीरज ठाकरे, हर्षल रोकडे, जितेंद्र बारापात्रे.
-------------
ओ पॉझिटिव्ह - मंगेश अंबे, वैभव धोटे, राजेश काळे, योगेंद्र पांडे, विलास डुंभरे, वैभव लोहकरे, टिंकू पटेल.
------------
ए निगेटिव्ह - रोहित हांडा, रोशन चौहान.
--------------
ओ निगेटिव्ह - डॉ. मृदुल मेश्राम.
............................