वेकोलि सोसायटी अध्यक्षाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2015 02:21 AM2015-05-09T02:21:59+5:302015-05-09T02:21:59+5:30

वेकोलि वर्कर्स क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षाचा अनोळखी तीन व्यक्तींनी धारदार शस्त्राने निर्घृण खून केला.

The blood of the president of the WikiLeo Chancellor | वेकोलि सोसायटी अध्यक्षाचा खून

वेकोलि सोसायटी अध्यक्षाचा खून

Next

सावनेर / खापरखेडा : वेकोलि वर्कर्स क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षाचा अनोळखी तीन व्यक्तींनी धारदार शस्त्राने निर्घृण खून केला. ही घटना पाटणसावंगी येथे शुक्रवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास घडली. खुनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, मृताच्या घरासमोर तसेच मेडिकलमध्ये त्यांच्या आप्तस्वकीयांनी मोठी गर्दी केली होती.
चिरकुट मोजे (५७) रा. पाटणसावंगी ह.मु. झिंगाबाई टाकळी, नागपूर असे मृताचे नाव आहे. त्यांचे पाटणसावंगीच्या हायवे चौकात राजहंस मंगल कार्यालय आणि लॉन आहे. तेथे कार्यक्रम सुरू होता. त्या कार्यक्रमात काही परिचित मित्रांसोबत ते होते. थोडा फेरफटका मारावा या उद्देशाने ते मित्रांसोबत सत्यम बारकडे पायी जाण्यास निघाले. दरम्यान घटनास्थळी तीन व्यक्ती आधीच दबा धरून तोंडावर रुमाल बांधून बसलेल्या होत्या. ते चिरकुट यांची येण्याची वाट बघत होते. तेथे जाताच त्या अनोळखी व्यक्तींनी धारदार शस्त्राने चिरकुट यांच्या मानेवर आणि पोटावर सपासप वार केले. त्यांच्या पोटाच्या आतड्या बाहेर निघून ते घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडले. याचवेळी आरोपींपैकी एकाने माऊझरमधून एक राऊंड फायर केला. यामुळे चिरकुट यांच्यासोबत असलेल्यांनी तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या चिरकुट यांच्याकडे पाहिल्यावर मृत्यू झाल्याची शक्यता वाटताच आरोपी तेथून अ‍ॅक्टिवाने पसार झाले.
आरोपी पसार होताच लोकांनी आरडाओरड केली आणि चिरकुट यांना लगेच आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तेथून मेडिकलमध्ये हलविले. त्यांच्या आप्तस्वकीयांना तसेच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती होताच ते मेडिकलमध्ये हजर झाले. चिरकुट मोजे यांना पत्नी, दोन मुली आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून लहान मुलगी ही त्यांनी स्थापन तयार केलेल्या सोसायटीत सचिव आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The blood of the president of the WikiLeo Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.