"आमच्या धमन्यात विदर्भाचे रक्त, आम्हाला विदर्भ प्रेम कुणी शिकवू नये," मुख्यमंत्र्यांची गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 06:38 PM2021-01-26T18:38:50+5:302021-01-26T18:40:31+5:30

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उद्घाटन आज संपन्न झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नामकरणाला विरोध करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी खडेबोल सुनावले आहेत.

"Blood of Vidarbha in our arteries, no one should teach us love for Vidarbha," roared the Chief Minister | "आमच्या धमन्यात विदर्भाचे रक्त, आम्हाला विदर्भ प्रेम कुणी शिकवू नये," मुख्यमंत्र्यांची गर्जना

"आमच्या धमन्यात विदर्भाचे रक्त, आम्हाला विदर्भ प्रेम कुणी शिकवू नये," मुख्यमंत्र्यांची गर्जना

googlenewsNext

नागपूर - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उद्घाटन आज संपन्न झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नामकरणाला विरोध करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी खडेबोल सुनावले आहेत. आमचे आजोळ विदर्भातील म्हणजे परतवाड्यातील आहे. त्यामुळे आमच्या धमण्यात विदर्भाचे रक्त वाहत आहे. त्यामुळे विदर्भ बाबतचे प्रेम आम्हाला कोणी शिकवू नये किंवा अपप्रचार देखील करू नये, असे खडेबोल उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचे आजोळ विदर्भातील म्हणजे परतवाड्यातील आहे. त्यामुळे आमच्या धमण्यात विदर्भाचे रक्त वाहत आहे. त्यामुळे विदर्भ बाबतचे प्रेम आम्हाला कोणी शिकवू नये किंवा अपप्रचार देखील करू नये. या क्षणापासून विदर्भाच्या विकासाकडे कसलेही दुर्लक्ष होणार नाही. आपणाला एकसंघ आणि सक्षम महाराष्ट्र घडवायचा आहे.

महाविकास आघाडीचे यापुढील प्रत्येक पाऊल हे विदर्भाच्या विकासाचे असेल.
नागपुरातील या प्राणी संग्रहालय एवढा देशात एकही झू नसावा. नागपुरात सिंगापूर नंतर नाईट सफारी सुरू केली जाणार आहे टुरिझम ही एक इंडस्ट्रीज आहे त्या दृष्टीने व नंतर विकास करणे ही आमची प्राथमिकता असेल
सुरजागड चा प्रकल्प देखील आम्हाला लवकरच मार्गी लावायचा आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

या सरकारबाबत विकासासंदर्भातील गैरसमज जाणून-बुजून पसरवला जात आहे. मात्र गोसेखुर्दच्या पाण्यानेच आम्हाला तो धुवून काढायचा आहे. नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग चे लोकार्पण 1 मे रोजी करण्याचा आमचा मानस आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title: "Blood of Vidarbha in our arteries, no one should teach us love for Vidarbha," roared the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.