तरुणाचा निर्घृण खून

By admin | Published: April 8, 2015 02:40 AM2015-04-08T02:40:37+5:302015-04-08T02:40:37+5:30

अमरावती मार्गावरील वाडीस्थित पेट्रोल पंपसमोर तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

The bloodless youth's blood | तरुणाचा निर्घृण खून

तरुणाचा निर्घृण खून

Next

वाडी : नागपूर - अमरावती मार्गावरील वाडीस्थित पेट्रोल पंपसमोर तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दगडाने ठेचून मृताचा चेहरा छिन्नविछिन्न करण्यात आला होता. यामुळे ओळख पटविण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. खुनाच्या या घटनेमुळे वाडी परिसरात खळबळ उडाली.
पिंटू ऊर्फ हरिदास तुळशीराम सूर्यवंशी (२५) रा. माहुली ता. खंडेश्वर जि. अमरावती असे मृताचे नाव आहे. तो वर्षभरापूर्वी शिवाजीनगर, दखने मोहल्ला वाडी येथे काका गणेश लक्ष्मण सूर्यवंशी यांच्याकडे राहायला आला होता. दरम्यान पिंटूला दारूचे व्यसन लागल्याने गणेश यांनी त्याला त्यांच्याकडे राहण्यास मनाई केली होती. तेव्हापासून पिंटू हा दिवसभर मोलमजुरी, हमालीचे काम करून रात्री बाहेरच जेवण करून जागा मिळेल तिथे झोपायचा. यादरम्यान त्याची अन्य दारुड्या मित्रांशी ओळख झाली.
सोमवारी रात्री मद्यप्राशन आणि जेवण करून तो वाडीतील पेट्रोल पंपसमोर झोपला होता. त्याच्या बाजूला दुसरी एक व्यक्ती झोपलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यादरम्यान बाजूच्या व्यक्तीलासुद्धा काहीच आवाज आला नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. सकाळच्या सुमारास खुनाची ही घटना लक्षात येताच पोलिसांना सूचना करण्यात आली. त्या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृताचा चेहरा चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे ओळख पटविण्यास बऱ्याच अडचणी आल्या. अखेर तो मृतदेह पिंटूचा असल्याचे स्पष्ट झाले.
खुनाच्या या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांनी वाडी पोलीस ठाण्याला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेतली. याप्रकरणी वाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक आर. एल. शिंदे हे तपास करीत आहे. आतापर्यंत चार संशयितांना ताब्यात घेतले असून मृताच्या बाजूला झोपलेल्या व्यक्तीचाही त्यामध्ये समावेश आहे. (प्रतिनिधी)\

Web Title: The bloodless youth's blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.