‘एक फूल दो माली’तून रक्तरंजित हल्ला, प्रियकराऐवजी जावयाच्या कुटुंबीयांवर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2023 07:55 PM2023-03-15T19:55:35+5:302023-03-15T19:56:14+5:30

Nagpur News एकाच मुलीवर प्रेम असणाऱ्या दोन तरुणांच्या वादाचा फटका एका प्रेमवीराच्या बहीण व जावयाला बसला. एका रोमियोच्या अंगात प्रेमामुळे अक्षरश: सैतान संचारला व त्याने बहीण, जावयासह संपूर्ण कुटुंबावरच चाकूने हल्ला केला.

Bloody attack from 'Ek Phool Do Mali', attack on son-in-law's family instead of lover | ‘एक फूल दो माली’तून रक्तरंजित हल्ला, प्रियकराऐवजी जावयाच्या कुटुंबीयांवर वार

‘एक फूल दो माली’तून रक्तरंजित हल्ला, प्रियकराऐवजी जावयाच्या कुटुंबीयांवर वार

googlenewsNext

नागपूर : एकाच मुलीवर प्रेम असणाऱ्या दोन तरुणांच्या वादाचा फटका एका प्रेमवीराच्या बहीण व जावयाला बसला. एका रोमियोच्या अंगात प्रेमामुळे अक्षरश: सैतान संचारला व त्याने बहीण, जावयासह संपूर्ण कुटुंबावरच चाकूने हल्ला केला. याशिवाय संबंधित मुलीवर प्रेम करणाऱ्याच्या बहिणीचा विनयभंगदेखील केला. या प्रकरणामुळे पारडी परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

मोहम्मद अन्वर मो. आलम (२६) याचे एका मुलीवर प्रेम असून मो. इमरान शेख उर्फ सोनू शेख ईसाक (२७, गंगाबाई शिव मंदिरजवळ, पारडी) याचेदेखील त्याच मुलीवर प्रेम आहे. या कारणावरून अन्वर व सोनूमध्ये अनेकदा वाद झाले आहेत. जलील बेग उर्फ इसराईल बेग (गौरीनगर, कळमना) हा अन्वरचा जावई असल्याची सोनूला माहिती होती. १३ मार्च रोजी मध्यरात्री पारडीतील गंगाबाई साईनगर नाल्याच्या पुलावरून जलील कामावरून घरी परतत होता. त्याच्या येण्या-जाण्याची वेळ व जागा माहिती असल्याने सोनू तेथे पोहोचला. सोनूसोबत त्याचा सहकारी मो. अयाज शेख (२८, गंगाबाग शिवमंदिर) व एक अल्पवयीन मुलगा हेदेखील होते. त्यांनी जलीलला गाठले व त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

पतीच्या मदतीसाठी धावताच चाकूचे वार...

जलीलला काही कळायच्या आतच सोनूने त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर चाकूने वार केले. पतीला मारहाण होत असल्याने त्याची पत्नी शबाना बेगम हीदेखील धावली. आरोपींनी तिचा विनयभंग केला व तिच्यावरदेखील चाकूने वार केले. तसेच त्यांची मुलं शाहीद बेग (१७) व जिशान बेग (१५) यांच्यावरदेखील चाकू, लाकडी काठीने वार केले. चौघांनाही आरोपींनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेतील चौघांनाही मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले.जलील यांच्या तक्रारीवरून पारडी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी सोनू व मो. अयाज यांना अटक केली आहे.

Web Title: Bloody attack from 'Ek Phool Do Mali', attack on son-in-law's family instead of lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.