बीएमए बायोडायव्हर्सिटी फॉरेस्ट साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:06 AM2021-07-03T04:06:36+5:302021-07-03T04:06:36+5:30

- बीएमएतर्फेे ‘ग्रीन डे’ साजरा नागपूर : पर्यावरण संतुलन कायम राखण्यासह उद्योजक आणि लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशने ...

BMA will set up a Biodiversity Forest | बीएमए बायोडायव्हर्सिटी फॉरेस्ट साकारणार

बीएमए बायोडायव्हर्सिटी फॉरेस्ट साकारणार

Next

- बीएमएतर्फेे ‘ग्रीन डे’ साजरा

नागपूर : पर्यावरण संतुलन कायम राखण्यासह उद्योजक आणि लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशने (बीएमए) ‘ग्रीन डे’ वृक्षारोपण करून साजरा केला. बीएमए मियावाकी थीमवर बायोडायव्हर्सिटी फॉरेस्ट आणि एक किमी लांब रस्त्याच्या दोन्ही बाजूला गुलमोहर झाडे लावणार आहे. याकरिता एमआयडीसी जागा उपलब्ध करून देणार आहे.

मुख्य अतिथी म्हणून एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल उपस्थित होते. अनबलगन यांनी फास्ट ट्रॅक बेसिसवर वृक्षारोपणासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) सहसंचालक डॉ. मोटघरे यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात एमआयडीसीचे मुख्य अभियंता राजेश झंझाळ, प्रदूषण मंडळाचे विभागीय अधिकारी अशोक कारे, एमआयडीसीचे ईई तिडके व श्रीवास्तव, विभागीय अधिकारी यादव, एमपीसीबीचे भिवापूरकर, वन विभागाचे वाडे, प्रा.डॉ. इटनकर, प्रायोजक इश मोहन गर्ग, परम संचेती प्रामुख्याने उपस्थित होते.

हा प्रकल्प बीएमएचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, सचिव शशिकांत कोठारकर, उपाध्यक्ष डॉ. मालविया यांच्या मार्गदर्शनात साकार होणार आहे. यावेळी प्रकल्प प्रमुख नितीन गुज्जेलवार, नितीन लोणकर, विजय जयस्वाल, अजय गुप्ता, शशीन अग्रवाल, हितेश अग्रवाल, संजय नागुलवार, ईशान गोयल उपस्थित होते.

Web Title: BMA will set up a Biodiversity Forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.