बोर्डाच्या विद्यार्थ्यांना करावी लगणार निकालाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 12:34 AM2020-05-26T00:34:51+5:302020-05-26T00:37:01+5:30
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल ३१ मेपर्यंत लागणे शक्यच नाही. कारण अजूनही बोर्डाकडे उत्तरपत्रिकांचे संकलन झालेले नाही. बोर्डाने सर्व मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांना ३१ मेपर्यंत उत्तरपत्रिका जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल ३१ मेपर्यंत लागणे शक्यच नाही. कारण अजूनही बोर्डाकडे उत्तरपत्रिकांचे संकलन झालेले नाही. बोर्डाने सर्व मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांना ३१ मेपर्यंत उत्तरपत्रिका जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बोर्डाच्या मुख्यालयाकडून सर्व विभागीय कार्यालयांना निर्देश देण्यात आले की, उत्तर पत्रिकांच्या संकलनाासाठी विभागांतर्गत येणाºया प्रत्येक जिल्ह्यात संकलन केंद्र बनविण्यात यावे. सूत्रांच्या नुसार नागपूर बोर्डाने १२ वीच्या उत्तरपत्रिका पहिले जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तरपत्रिका जमा झाल्यानंतर निकालाची पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे. आतापर्यंत बारावीच्या ८० टक्के उत्तरपत्रिका बोर्डाच्या नागपूर कार्यालयात जमा झाल्या आहेत. उर्वरित उत्तरपत्रिका पोहचण्याच्या प्रतीक्षेत आहेत. बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरात लवकर निकाल घोषित करण्यासाठी विभागीय कार्यालयांना एक अवधी दिला आहे. अपेक्षित आहे की येत्या १० जूनपर्यंत निकाल घोषित होईल. बारावीच्या निकालाचे काम संपल्यानंतरच दहावीच्या निकालाचे काम सुरू होईल.