बॉबी माकन अपहरण - हत्याकांड : कोट्यवधींची सुपारी अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:14 AM2019-05-07T00:14:51+5:302019-05-07T00:17:52+5:30

उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांडाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यश मिळविले ंअसले तरी याप्रकरणातील अनेक मुद्दे अद्याप गुलदस्त्यात आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचा आरोप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अपहरणानंतर कुख्यात गुंड मंजित वाडे यानेच बॉबीचा गळा आवळून त्याला ठार मारल्याचे अटकेतील आरोपी सांगत आहेत. बॉबीचा गेम करण्यासाठी कोयवधींची सुपारी घेतल्याची बाब मात्र लपविली जात असल्याची चर्चा आहे.

Bobby Maken Kidnapping - murder case: Crores of Supari in the Dark | बॉबी माकन अपहरण - हत्याकांड : कोट्यवधींची सुपारी अंधारात

बॉबी माकन अपहरण - हत्याकांड : कोट्यवधींची सुपारी अंधारात

Next
ठळक मुद्देआरोपींकडून पोलिसांची दिशाभूल : कुख्यात मंजित वाडे फरारच

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांडाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यश मिळविले असले तरी याप्रकरणातील अनेक मुद्दे अद्याप गुलदस्त्यात आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचा आरोप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अपहरणानंतर कुख्यात गुंड मंजित वाडे यानेच बॉबीचा गळा आवळून त्याला ठार मारल्याचे अटकेतील आरोपी सांगत आहेत. बॉबीचा गेम करण्यासाठी कोयवधींची सुपारी घेतल्याची बाब मात्र लपविली जात असल्याची चर्चा आहे.
प्रचंड खळबळ उडवून देणारे हे प्रकरण गुरुवारी २५ एप्रिलच्या मध्यरात्री सुरू झाले. आरोपींनी बॉबी माकन यांचे अपहरण केले आणि त्यांची कार बेवारस अवस्थेत घरापासून काही अंतरावर सोडून दिली. ती आढळल्याने आणि बॉबीचे तीनही मोबाईल बंद असल्यामुळे २६ एप्रिलच्या दुपारी बॉबीच्या पत्नीने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविली होती. जरीपटका पोलिसांनी मिसिंगची नोंद घेतली. २८ एप्रिलला बॉबीचा मृतदेह कोंढाळीजवळ सापडल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करून अपहरणकर्त्यांचा आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी जरीपटका, पाचपावली आणि गुन्हे शाखेची पथके शोधाशोध करू लागली. सात दिवस होऊनही काहीच हाती न लागल्यामुळे पोलिसांवर प्रचंड दडपण आले होते. अखेर ज्या इनोव्हातून बॉबीचे अपहरण करण्यात ती इनोव्हा कार पोलिसांनी जप्त केली. त्या आधारे नंतर हनी चंडोकला मुंबईतून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने या अपहरणाचा खुलासा केला. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री कुख्यात लिटिल सरदार, त्याचा बॉडीगार्ड सिटू गौर, बाबू खोकर आणि हनी चंडोकला अटक केली. मंजित वाडे आणि अन्य काही आरोपी फरार आहेत. या अपहरण हत्याकांडाचा सूत्रधार कुख्यात लिटिल सरदार असल्याचे अटकेतील आरोपी पोलिसांना सांगत आहेत. मात्र, बॉबीची हत्या मंजित वाडे याने केल्याचेही ते सांगत असल्याचे पोलीस सुत्रांकडून कळते. वाडे सध्या फरार आहे. लिटिलरवर दोन वर्षांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. यावेळी तीन गोळळ्या लागूनही लिटिल बचावला होता.
या फायरिंगमध्ये बॉबी असल्याचा लिटिलला संशय होता, त्यामुळे त्याने अपहरण आणि हत्याकांडाचा कट रचल्याचे लिटिलने पोलिसांना सांगितले आहे. परंतू ही हत्या मंजित वाडेनेच केल्याचे आरोपी सांगत आहेत.
सुपारी देणारे मोकळेच !
बॉबीने कमाल चौकातील पवन मोर्यानीची कोट्यवधींची मालमत्ता तसेच दुसरी एक १०० कोटींची जमिन अडवून धरली होती, त्यामुळे अडीच कोटींची सुपारी देऊन बॉबीची हत्या केल्याची सर्वत्र चर्चा आहे. परंतू हा मुद्दा लपविला जात आहे. त्यामुळे सुपारी देणारे आरोपी मोकळे आहेत. त्याचमुळे या प्रकरणातील आरोपींना आर्थिक रसद पुरविली जाईल. आरोपींना केस लढविण्यासाठी त्याचा पुढे फायदा मिळू शकतो, अशीही चर्चा आहे.

Web Title: Bobby Maken Kidnapping - murder case: Crores of Supari in the Dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.