सीताबर्डीत आढळला मृतदेह

By admin | Published: March 23, 2017 02:30 AM2017-03-23T02:30:34+5:302017-03-23T02:30:34+5:30

रेल्वे स्थानक मार्गावरील सैन्यदलाच्या परिसराला लागून असलेल्या झुडपी भागात एका इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.

The bodies found in the citadel | सीताबर्डीत आढळला मृतदेह

सीताबर्डीत आढळला मृतदेह

Next

सैन्यदलाचा परिसर : दोन्ही हातपाय गायब, हत्येचा संशय
नागपूर : रेल्वे स्थानक मार्गावरील सैन्यदलाच्या परिसराला लागून असलेल्या झुडपी भागात एका इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. मृतदेह कुजलेल्या आणि दोन्ही हात नसलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याची हत्या झाली असावी, असा संशय आहे. मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. मात्र, त्याचा मृत्यू किमान तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मानस चौकातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूला झुडपी भाग आहे. हा भाग सैन्यदलाच्या परिसरात येतो. फोर्ट लाईन ११८ बटालियनचे जवान फकीर मेहबूब हसन (वय ३७) हे मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास परिसरात गस्त करीत असताना त्यांना तीव्र दुर्गंधी आली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह झुडपात बघितले असता एक मृतदेह आढळला. मृतदेह पुरता कुजलेला होता. शरीराला दोन्ही हात नव्हते. पायही गायब होता. शरीराचा काही भाग जळाल्यासारखा दिसत होता. ही माहिती फकीर यांनी आपल्या वरिष्ठांना आणि सीताबर्डी ठाण्यात कळविली. लगेच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. तोपर्यंत तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मृतदेहाची अवस्था बघून हत्या झाल्याचा संशय अनेकांनी घेतला. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तो मेडिकलमध्ये पाठविला.
सैन्यदलाच्या संवेदनशील भागात अशाप्रकारे मृतदेह आढळल्याने पोलिसही हादरले. त्यांनी डॉक्टरांना तातडीने शवविच्छेदन अहवाल मागितला. मात्र, मृतदेहाची एकूणच अवस्था बघून डॉक्टरांनी निश्चित अहवाल लगेच देता येणे शक्य नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

मृत नशेडी
मृताच्या कपड्यात पोलिसांना टायरचा पंक्चर जोडण्यासाठी वापरली जाणारी सोल्युशनची ट्यूब आढळली. कचरा वेचणारे, भीक मागणारे, छोटे-मोठे गुन्हेगार या सोल्युशनचा नशेसाठी वापर करतात. त्यामुळे मृत व्यक्ती नशेडी असावा, असा अंदाज पोलिसांनी काढला. मात्र, त्याची हत्या झाली की नशेच्या अवस्थेत तो त्या भागात पोहोचला आणि त्याचा मृत्यू झाला, त्याबाबत पोलीस ठोस निष्कर्ष काढू शकले नाही. संबंधित परिसरात जंगली जनावरे आहेत. त्यामुळे जनावरांनी त्याच्या पायाचा, डोक्याच्या केसाचा भाग खाल्ल्याचे पोलीस सांगतात. तूर्त याप्रकरणी फकीर यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृताची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत.

 

Web Title: The bodies found in the citadel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.