चिचभवन परिसरातील खदान तलावात आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:08 AM2021-01-15T04:08:48+5:302021-01-15T04:08:48+5:30
गोंडखैरी : चौदामैल ते कळमेश्वर रस्त्यावर असलेल्या चिचभवनमधील खदान तलावात एका इसमाचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला. सुनील ...
गोंडखैरी : चौदामैल ते कळमेश्वर रस्त्यावर असलेल्या चिचभवनमधील खदान तलावात एका इसमाचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला. सुनील संतलाल कठोते (४५ रा. चिचभवन) असे मृताचे नाव आहे. सुनील हा रविवारी मध्यरात्रीला घरून अचानक निघून गेला. तो घरी परत न आल्याने त्याच्या पत्नीने परिसरात शोधाशोध केली. बुधवारी तलावात मृतदेह तरंगत असल्याची बाब समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. यासंदर्भात मनोज घोडमारे यांंनी कळमेश्वर पोलिसांना सदर घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत स्थानिकांच्या मदतीने तलावातील मृतदेह बाहेर काढला. वृत्त लिहिस्तोवर सुनील याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाली, अंमलदार संदीप वाघमारे, पोलीस पाटील प्रदीप गावंडे करीत आहे.