शॉकींग ! तुरीच्या शेतात आढळला 5 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह, अत्याचार करुन खून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 05:30 PM2019-12-08T17:30:10+5:302019-12-08T19:28:12+5:30
प्राप्त माहितीनुसार लिंगा येथील नीलम धुर्वे ही आपल्या आजीच्या घरी जातो म्हणून घरून निघून गेली.
नागपूर - हैदराबाद आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाची घटना ताजी असतानाच नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत एका चिमुकलीवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. कळमेश्वर पोलीस स्टेशनपासून पंधरा किलोमीटरवरील लिंगा येथील संजय भारती रा नागपूर यांच्या शेतात या कुमारीचा (वय 5) मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार लिंगा येथील चिमुकली धुर्वे ही आपल्या आजीच्या घरी जातो म्हणून घरून निघून गेली. परंतु दुसऱ्या दिवशी ती घरी न आल्याने तिच्या आईने तिच्या आजीची विचारपूस केली असता आजीने सांगितले की ती काल काही आली नाही त्यामुळे एकच तारांबळ उडत मुलीच्या कुटुंबाने मुलीचा शोधाशोध सुरू केला व सायंकाळी सहाच्या दरम्यान पोलीस स्टेशन गाठून मुलगी बेपत्ता असल्याची प्राथमिक रिपोर्ट दिली. याची दखल घेत कळमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस पाटील तसेच इतर युवकांनी मुलीचा रात्री शोध घेतला पण मुलगी कुठेही आढळून न आल्यामुळे पोलीस परत आले. आज दिनांक 8 डिसेंबरला सकाळी पोलीस पोलीस पाटील व लिंग येथील युवकांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता आजूबाजूच्या शिवारात पाहणी केली असता गावाला लागून असलेल्या संजय भारती यांच्या तुरीच्या शेतात मुलीचा मृत्यूदेह गावातील पोलीस पाटील शंकर झाडे यांना दिसून आला यामध्ये प्राथमिक तपासात मुलीच्या तोंडात बोळा कुचकुण तिला कपाळाला दगडाला ठेचून मारण्यात आल्याचे दिसले. सावनेर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक साबरकर अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत पोलीस अधीक्षक राकेश ओला सह शवन पथक फिंगर प्रिंट एक्सपोर्ट हे आले व त्यांनी संपूर्ण शिवाराची पाहणी केली, व मुलीचा मृतदेह नागपूर मेडिकल रुग्णालय येथे पोस्टमार्टम करता पाठविण्यात आला.
मुलीचे वडील शांताराम धुर्वे रा गागतवाडा त सैसार जिल्हा छिंदवाडा येथील असून गेल्या पाच वर्षापासून शेतीच्या कामासाठी लिंगा येथे राहते त्यांना दोन पत्नी असून त्या दोघी या सख्या बहिणी असून सौथी झाले आहे तर त्यांची पहिली पत्नी शेवंती धुर्वे वय 25 तिची ही दुसरी मुलगी आहे
पोलिसांनी घेतले ताब्यात
या शेतात पाणी वलण्याकरता गावातील युवकाला ठेवण्यात आले होते त्याच्यावर पोलिसांचा संशय असून त्याला प्राथमिक चौकशी करीत पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे आणण्यात आले.