बेपत्ता मजुराचा मृतदेह गवसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:40+5:302021-06-29T04:07:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : घरून कुणालाही न सांगता निघून गेलेल्या शेतमजुराचा मृतदेह कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खरबी-खाेबना मार्गालगतच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : घरून कुणालाही न सांगता निघून गेलेल्या शेतमजुराचा मृतदेह कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खरबी-खाेबना मार्गालगतच्या झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने दुपट्ट्याच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी तपासात निषन्न झाले. हा प्रकार साेमवारी (दि. २८) सकाळी उघडकीस आला.
दौलत बाबूलाल ठाकरे (२७, रा. वाॅर्ड क्रमांक-२, कुही) असे मृताचे नाव आहे. ताे गुरुवारी (दि. २४) सकाळी कुणालाही न सांगता घराबाहेर पडला हाेता. त्यातच त्याने त्याचा माेबाइल स्वत:साेबत न नेता घरीच ठेवला हाेता. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शाेध घ्यायला सुरुवात केली. फाेन घरीच असल्याने कुटुंबीयांना त्याच्याशी फाेनवर संपर्क करणेही शक्य नव्हते.
दरम्यान, साेमवारी सकाळी खरबी-खाेबना मार्गालगतच्या गाेठा परिसरातील झाडाच्या फांदीला त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्याने आत्महत्या केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. ताे विवाहित असून, अनेक दिवसांपासून काम नसल्याने त्याला आर्थिक अडचणी जाणवत हाेत्या. याच विवंचनेत त्याने आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. याप्रकरणी कुही पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.