१० महिन्यांपासून बोईंग ७७ अडकले एमआरओमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 11:05 AM2020-10-13T11:05:52+5:302020-10-13T11:09:06+5:30
Boeing 77 Nagpur News मागील १० महिन्यांपासून एका बोईंग ७७ विमानाचे मेन्टेनन्स होऊ शकलेले नाही. हे विमान मागील जानेवारी महिन्यापासून आजही एमआरओमध्येच प्रतीक्षेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहान परिसरात असलेल्या एयर इंडियाच्या जागतिक पातळीवरील एमआरओमध्ये बोईंग ७७७ च्या मेन्टेनन्सची सर्व सुविधा आहे. असे असतानाही मागील १० महिन्यांपासून एका बोईंग ७७ विमानाचे मेन्टेनन्स होऊ शकलेले नाही. हे विमान मागील जानेवारी महिन्यापासून आजही एमआरओमध्येच प्रतीक्षेत आहे.
जवळपास ३५० प्रवासी क्षमता असलले हे विमान दिल्लीवरून विदेशी प्रवासासाठी उड्डाण करीत होते. त्यामधील मोठ्या व महत्वाच्या दुरूस्तीसाठी ते नागपुरातील एमआरओकडे पाठविण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीमुळे विमानाचे सुटे भाग विदेशामधून मागविता आले नाही. आवश्यक असणाऱ्या सुट्या भागांशिवाय दुरुस्ती होणे शक्य नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीच्या प्रतीक्षेत हे विमान पुन्हा काही दिवस असेच उभे राहिले तर अजून नव्या तांत्रिक समस्या निर्माण होऊन दुरूस्तीचा खर्च वाढू शकतो. सुटे भाग मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र ते कधी मिळतील, हे स्पष्ट नाही.