बोगस ‘रॉ’ अधिकाऱ्याने पत्नीलाही फसविले : लग्न करून एक कोटी हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:00 AM2020-07-30T00:00:04+5:302020-07-30T00:02:23+5:30

‘रॉ’ ऑफिसर बनून चित्रपट निर्माते विपुल शाह यांच्या पार्टनरला पाच कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या झारखंड येथील चर्चित राजेश सिंह याने आपल्या पत्नीलाही फसविले. एक कोटी रुपये हडपण्यासाठी त्याने लग्न केले होते.

Bogus 'Raw' officer also cheated on his wife: got married and grabbed Rs 1 crore | बोगस ‘रॉ’ अधिकाऱ्याने पत्नीलाही फसविले : लग्न करून एक कोटी हडपले

बोगस ‘रॉ’ अधिकाऱ्याने पत्नीलाही फसविले : लग्न करून एक कोटी हडपले

Next
ठळक मुद्दे बजाजनगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘रॉ’ ऑफिसर बनून चित्रपट निर्माते विपुल शाह यांच्या पार्टनरला पाच कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या झारखंड येथील चर्चित राजेश सिंह याने आपल्या पत्नीलाही फसविले. एक कोटी रुपये हडपण्यासाठी त्याने लग्न केले होते. फसवणुकीची ही घटना बजाजनगर पोलीस ठाणे अंतर्गत घडली. राजेश कुमार तारकेश्वर सिंह (४२) रा. रांची, झारखंड असे आरोपीचे नाव आहे.  राजेश एक रिसोर्टवर काम करीत होता. यादरम्यान त्याची पीडित रेणुकासोबत ओळख झाली. रेणुकाच्या आईकडे एक घर होते. त्याची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. याची कल्पना राजेशला असल्याने त्याने रेणुकाला आपल्या जाळ्यात अडकविले. पोलीस सूत्रानुसार, २०१४ मध्ये राजेशने रेणुकाला तिच्या पहिल्या पतीशी घटस्फोट घेऊन त्याच्याशी मंदिरात लग्न करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिचे घर हडपण्याची तयारी केली. रेणुकाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर बोगस स्वाक्षरीद्वारे स्वत:ला घरात भाडेकरू असल्याचे सांगितले. बोगस मृत्युपत्र बनवून रेणुकाच्या भावालाही वडिलांच्या संपत्तीतून बेदखल केले. त्याची ही योजना यशस्वी ठरली नाही आणि काही दिवसानंतर रेणुकाने घर विकले. त्यानंतर राजेशने रेणुकाला घर विक्रीतून मिळालेले एक कोटी रुपये हडपण्याची तयारी सुरू केली. काही दिवसानंतर रेणुकाची प्रकृती अतिशय खालावली. याचा गैरफायदा घेऊन राजेशने एक कोटी रुपये हडपले आणि रांचीमध्ये एका दुसºया महिलेशी लग्नही केले.
 रेणुकाला आपल्या जाळ्यात अडकवीत असतानाच राजेश सिंह इरिडियम घोटाळ्याशी जुळला. त्याने निर्माते विपुल शाह यांचे भागीदार विनीत सिंघी यांना चित्रपटात फायनान्स उपलब्ध करून देण्याच्या नावावर नागपुरात बोलावले. राजेशने त्यांना तो गुप्तचर संस्था रॉ चा इंटरपोल आॅफिसर असल्याचे सांगितले. इरिडियमच्या खरेदी-विक्रीमध्ये मोठी कमाई असल्याचे आमिष दिले. याप्रकारे विनीत यांच्यासह अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून ५ कोटी रुपयांची फसवणूक केली. हे प्रकरण उघडकीस येताच आर्थिक शाखेने गुन्हा दाखल करून राजेश सिंहला अटक केली. यादरम्यान रेणुकालाही त्याचे खरे रूप लक्षात आले. तिने बजाजनगरात तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी प्रकरण बंद करण्याची शिफारस केली. पोलिसांच्या या हलगर्जीमुळे २०१९ मध्ये राजेशला इरिडियम घोटाळा प्रकरणातही जामीन मिळाला.
 बजाजनगर पोलिसांच्या या भूमिकेमुळे दुखावलेल्या रेणुकाने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे तक्रार केली. पोलीस आयुक्तांनी रेणुकाच्या तक्रारीला गांभीर्याने घेत गुन्हे शाखेकडे याचा तपास दिला. या आधारावर राजेश सिंह विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बजाजनगर पोलिसांच्या या भूमिकेमुळे दुखावलेल्या रेणुकाने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे तक्रार केली. पोलीस आयुक्तांनी रेणुकाच्या तक्रारीला गांभीर्याने घेत गुन्हे शाखेकडे याचा तपास दिला. या आधारावर राजेश सिंह विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Bogus 'Raw' officer also cheated on his wife: got married and grabbed Rs 1 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.