नागपुरात गायकांनी घडवली रसिकांना बॉलिवूड रेट्रो युगाची सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 10:52 PM2019-07-27T22:52:23+5:302019-07-27T22:54:26+5:30
पावसाळी मौसम आणि त्यात हिंदी चित्रपटातील, त्यातही जुन्या काळातील अर्थात रेट्रो जमान्यातील बॉलिवूड गाणी, म्हणजे एक अद्भूत संगम. या संगमाची सफर आज डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात नागपूरकर रसिकांनी अनुभवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळी मौसम आणि त्यात हिंदी चित्रपटातील, त्यातही जुन्या काळातील अर्थात रेट्रो जमान्यातील बॉलिवूड गाणी, म्हणजे एक अद्भूत संगम. या संगमाची सफर आज डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात नागपूरकर रसिकांनी अनुभवली.
स्वरवेध आणि स्वरतरंग म्युझिक अकादमीच्यावतीने प्रसिद्ध युवा गायक निरंजन बोबडे व अॅड. भानूदास कुळकर्णी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘हिट्स ऑफ मोहम्मद रफी आणि किशोर कुमार’ या कार्यक्रमाचे आयोजन देशपांडे सभागृहात करण्यात आले होते. हा कार्यक्रम आणि बऱ्याच कालावधीनंतर निर्माण झालेल्या पावसाळी झळा, असा संयोग शनिवारी जुळून आला होता. त्यात निरंजन बोबडेसह पार्वथी नायर, अमीत गणवीर, राधिका देशपांडे व नंदू अंधारे यांच्या सुरेल स्वरांतून मो. रफी व किशोर कुमार यांची गाजलेली गाणी सादर केली. उपस्थित रसिकांनी ही गाणी उचलून धरली आणि सुहाना मोसमात दर्दे दिल गाण्यांचा आनंद लुटला. निसार खान यांच्या निवेदनाने प्रत्येक गाणे आणि त्या गाण्यांचा संदर्भ उलगडून दाखवताना, रसिकांना गीत निर्मितीच्या प्रवासात नेण्याची किमया साधली. यावेळी, मन तडपत हरी दर्शन.. तेरे बिना जिंदगी से कोई, दर्दे दिल, मोहब्बत जिंदा रहती है.. वो श्याम कुछ अजिब थी.. कुहू कुहू बोले कोयलिया.. नैन मिलाके चैन चुराया.. अकेले है चले आओ.. पग घुंगरू बांध.. एक मैं और एक तू.. सुहानी रात... दिन ढल जाए.. खिलते है गुल यहाँ, पायलवाली देख ना.. मधुबन मे राधिका.. दो सितारो का जमी पर.. सलामें इश्क मेरी.. दिल जो ना कह सका.. उडे जब जब जुल्फे.. इंतेहा हो गई इंतजार की.. आ लगजा गले.. तू गंगा की... नाचे मन मोरा.. ही गाणी सादर करण्यात आली. गायकांना कीबोर्डवर महेंद्र ढोले, परिमल जोशी, गिटार प्रसन्ना वानखेडे,
कांगो व ढोलक वर दीपक कांबळे, ड्रमवर सुभाष वानखेडे, तबल्यावर पंकज यादव आणि अॅड. भानुदास कुळकर्णी यांनी साथसंगत केली.