खळबळजनक! भंगार दुकानात बॉम्बस्फोट; एक मजूर ठार तर एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 09:55 PM2022-07-18T21:55:13+5:302022-07-18T22:18:56+5:30

Nagpur News भंडारा रोडवर असलेल्या कापसी गावातील भंगार गोदामात पुलगाव येथून आणलेले निकामी बाॅम्बशेल कटरने कापत असताना झालेल्या स्फोटात एक मजूर जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

Bomb blast in garbage shop; One worker killed and one injured | खळबळजनक! भंगार दुकानात बॉम्बस्फोट; एक मजूर ठार तर एक जखमी

खळबळजनक! भंगार दुकानात बॉम्बस्फोट; एक मजूर ठार तर एक जखमी

googlenewsNext

नागपूरः निकामी समजून दारूगोळा (बॉम्ब शेल) गॅस कटरने कापत असताना जोरदार स्फोट झाला. त्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा जबर जखमी झाला. भंडारा मार्गावर पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भंगार गोदामात सोमवारी सायंकाळी हा थरार घडला.  गुड्डु भभूतलाल रतनेरे (वय ५२, उप्पलवाडी) असे मृताचे तर सुमीत सुकरलाल मरसकोल्हे (वय २१, रा. यशोधरानगर) असे जखमीचे नाव आहे. 
 

अब्दुल रशीद अब्दुल अजीज (वय ४८, रा. हसनबाग) नामक व्यक्तीचे भंडारा मार्गावरील पारडी - कापसीतील बाराद्वारी येथे ए. आर. ट्रेडर्स नावाने भंगाराचे मोठे गोदाम आहे. अब्दुल रशीद हे भंगाराचे मोठे व्यापारी असून त्यांनी पुलगावच्या (जि. वर्धा) सीएसडी कॅम्पमध्ये ३० मे २०२२ झालेल्या लिलावात निकामी दारूगोळा विकत घेतला होता. हा दारूगोळा गोदामात ठेवल्यानंतर काही दिवसांपासून त्याच्या कटिंगचे काम सुरू झाले. सोमवारी सायंकाळी गुड्डू रतनेरे दारूगोळ्यातील एक बॉम्ब शेल गॅस कटरने कापत होते. मदतीसाठी बाजुलाच सुमीत होता. शेल कापताना शक्तीशाली स्फोट झाला. त्यात गुड्डु रतनेरे जागीच ठार झाले. तर सुमीत सुकरलाल मरसकोल्हे (वय १९) हा जखमी झाला. हा स्फोट एवढा शक्तीशाली होता की आजुबाजुच्या परिसरातही मोठा आवाज होऊन हादरा बसला. जखमी सुमितसह गोदामाच्या बाजुला असलेल्यांनी आरडाओरड करीत धाव घेतली. ते पाहून बाजुच्या परिसरातील मंडळींनी पारडी पोलिसांना कळविले.

ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. माहिती कळताच पोलीस उपायुक्त सारंग अव्हाड, सहायक आयुक्त नयना अलुरकर यांच्यासह बॉम्ब शोधक (बीडीडीएस) आणि नाशक पथक, गुन्हे शाखेचे आणि अग्निशमन दलाचे पथकही पोहचले. जखमी सुमीतला एका खासगी ईस्पितळात दाखल करण्यात आले. 

सभोवतालचा परिसर सील
बॉम्ब स्फोट झाल्याचे वृत्त वायुवेगाने सर्वत्र पोहचले. त्यामुळे घटनास्थळी पावसाचे वातावरण असूनदेखिल अल्पावधीतच मोठी गर्दी जमली. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी बीडीडीएसच्या माध्यमातून गोदाम आणि सभोवतालचा परिसर सील करून घेतला.

Web Title: Bomb blast in garbage shop; One worker killed and one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Blastस्फोट