बॉम्ब असल्याचे सांगून वेडसर इसमाने फोडला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 09:09 PM2018-02-21T21:09:13+5:302018-02-21T21:15:39+5:30

ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधील एक प्रवासी खाली उतरला. घाबरलेल्या अवस्थेत तो इकडे-तिकडे पळत सुटला. आरपीएफ जवानांनी त्यास कारण विचारले असता आपल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याचे त्याने सांगितले अन् आरपीएफ जवानांसह प्रवाशांनाही थोड्या वेळासाठी घाम फुटला. त्याच्या बॅगची तपासणी केली असता काहीच आढळले नसल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Bomb hoax spread by maddy person | बॉम्ब असल्याचे सांगून वेडसर इसमाने फोडला घाम

बॉम्ब असल्याचे सांगून वेडसर इसमाने फोडला घाम

Next
ठळक मुद्देज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधील प्रवासी घाबरले : आरपीएफने केले कुटुंबीयांच्या स्वाधीन

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधील एक प्रवासी खाली उतरला. घाबरलेल्या अवस्थेत तो इकडे-तिकडे पळत सुटला. आरपीएफ जवानांनी त्यास कारण विचारले असता आपल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याचे त्याने सांगितले अन् आरपीएफ जवानांसह प्रवाशांनाही थोड्या वेळासाठी घाम फुटला. त्याच्या बॅगची तपासणी केली असता काहीच आढळले नसल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
बुधवारी सकाळी १० वाजता रेल्वेगाडी क्रमांक १२१०२ कुर्ला-हावडा ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आली. यावेळी आरपीएफचे उपनिरीक्षक कृष्णानंद राय, सहायक उपनिरीक्षक अभय बेदरकर, ओमेश्वर चौहान प्लॅटफॉर्मवर गस्त घालत होते. तेवढ्यात एक इसम जोरात ओरडत इकडे-तिकडे पळत होता. आरपीएफ जवानांनी त्यास कारण विचारले असता आपल्या बॅगमध्ये कोणीतरी बॉम्ब ठेवल्याची माहिती त्याने दिली. त्यामुळे इतर प्रवाशांमध्येही घबराट पसरली. आरपीएफ जवानांनी कोचमध्ये जाऊन त्याची बॅग तपासली असता त्यात काहीच आक्षेपार्ह आढळले नाही. दरम्यान संबंधित इसम आपल्या अंगावरील शर्ट, पँट काढत होता. आपल्या कपड्यातही बॉम्ब ठेवला असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर तो वेडसर असल्याची आरपीएफ जवानांची खात्री पटली. त्यास आरपीएफ ठाण्यात आणून वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना याबाबत सूचना देण्यात आली. त्याच्यासाठी भोजन मागविण्यात आल्यानंतर कुटुंबाबाबत विचारणा केली असता त्याने वडिलांचा मोबाईल क्रमांक दिला. मोबाईलवर संपर्क साधला असता तो मानसिकदृष्ट्या आजारी असून घरातून पाच दिवसांपूर्वी पळून गेल्याची माहिती देण्यात आली. त्याचे वडील आरपीएफ ठाण्यात आल्यानंतर त्यास त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: Bomb hoax spread by maddy person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.