नागपूर रेल्वेस्थानकावर अफवा बॉम्बची, सापडली दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 09:51 PM2018-10-13T21:51:02+5:302018-10-13T21:51:55+5:30

संघमित्रा एक्स्प्रेसच्या ए १ कोचमध्ये बराच वेळपासून एक बेवारस बॅग पडून होती. त्यात बॉम्ब असू शकतो अशी शंका प्रवाशांना आली. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच रेल्वे सुरक्षा दलाने हँड मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने बॅगची तपासणी केली. बॅगमध्ये स्फोटके नाही तर दारूच्या बॉटल्स आढळल्याचे पाहून सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Bomb Rumor , found liquor at Nagpur railway station | नागपूर रेल्वेस्थानकावर अफवा बॉम्बची, सापडली दारू

नागपूर रेल्वेस्थानकावर अफवा बॉम्बची, सापडली दारू

Next
ठळक मुद्देसंघमित्रा एक्स्प्रेसमधील घटना : बेवारस बॅगमुळे प्रवासी घाबरले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संघमित्रा एक्स्प्रेसच्या ए १ कोचमध्ये बराच वेळपासून एक बेवारस बॅग पडून होती. त्यात बॉम्ब असू शकतो अशी शंका प्रवाशांना आली. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच रेल्वे सुरक्षा दलाने हँड मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने बॅगची तपासणी केली. बॅगमध्ये स्फोटके नाही तर दारूच्या बॉटल्स आढळल्याचे पाहून सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
शनिवारी रेल्वेगाडी क्रमांक १२२९५ बेंगळुरू-पटना संघमित्रा एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर सकाळी ९ वाजता आली. या गाडीच्या ए १ कोचमध्ये बराच वेळपासून एक बॅग बेवारस स्थितीत ठेवलेली होती. त्यामुळे या कोचमधील प्रवाशांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. प्लॅटफॉर्मवर गाडी येताच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान विकास शर्मा, श्याम झाडोकर, विवेक कनोजिया नियमित तपासणी करीत असताना प्रवाशांनी त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर आरपीएफ जवानांनी हँड मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने बॅगची तपासणी केली असता त्यात बॉम्ब नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बॅगची तपासणी केली असता पाकिटात दारूच्या ३८७० रुपये किमतीच्या ४ बॉटल आढळल्या. बेवारस बॅगमध्ये दारू असल्याचे समजल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर संघमित्रा एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

तेलंगाणा एक्स्प्रेसमध्ये ९९ बॉटल जप्त
शनिवारी सकाळी १० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर १२७२४ तेलंगाणा एक्स्प्रेसच्या एस ४ कोचमध्ये दोन व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळल्या. त्यांनी आपले नाव विशाल रॉबीन दास (२८) आणि राजु रॉबिन दास (३१) रा. भिवापूर, चंद्रपूर सांगितले. त्यांच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या १३१६० रुपये किमतीच्या ९५ बॉटल आढळल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द करण्यात आली.

 

Web Title: Bomb Rumor , found liquor at Nagpur railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.