काँग्रेसकडून मतमोजणीवर आक्षेपांचा भडीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 10:07 PM2019-05-23T22:07:17+5:302019-05-23T22:18:21+5:30

नागपूर व रामटेकच्या मतमोजणीला सुरुवात होताच काँग्रेसकडून ईव्हीएम बदलण्यात आल्याची तक्रार करीत मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला. यानंतर मतमोजणीची प्रक्रिया पार पडेपर्यंत काँग्रेसकडून आक्षेपांचा भडीमार सुरूच होता. रामटेकचे काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी तब्बल ५० वर आक्षेप घेतले. तर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी थेट जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मतमोजणीत तफावत असल्याची तक्रार केली.

Bombarding from the Congress on the counting of objections | काँग्रेसकडून मतमोजणीवर आक्षेपांचा भडीमार

काँग्रेसकडून मतमोजणीवर आक्षेपांचा भडीमार

Next
ठळक मुद्देकिशोर गजभिये यांनी घेतले ५० वर आक्षेप नाना पटोले यांनीही केली मतमोजणीच्या संख्येत तफावत असल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर व रामटेकच्या मतमोजणीला सुरुवात होताच काँग्रेसकडून ईव्हीएम बदलण्यात आल्याची तक्रार करीत मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला. यानंतर मतमोजणीची प्रक्रिया पार पडेपर्यंत काँग्रेसकडून आक्षेपांचा भडीमार सुरूच होता. रामटेकचे काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी तब्बल ५० वर आक्षेप घेतले. तर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी थेट जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मतमोजणीत तफावत असल्याची तक्रार केली. 


मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. मतमोजणीच्या प्रक्रियेत असलेल्या उत्तर नागपुरातील काँग्रेस प्रतिनिधींकडे ईव्हीएम मशीनच्या क्रमांकाची यादी होती. मोजणीच्या वेळी प्रतिनिधींकडे असलेल्या ईव्हीएमच्या यादीतील क्रमांक आणि प्रत्यक्षात मोजणीच्या वेळी असलेल्या ईव्हीएम मशीनच्या क्रमांकात तफावत होती. दक्षिण व मध्य नागपूर विधानसभेतही असाच प्रकार लक्षात आला. काँग्रेसच्या प्रतिनिधींनी यावर आक्षेप घेतला. तीन ईव्हीएम मशीनच्या क्रमांकात घोळ असल्याचे त्यांनी सांगितले. मध्य नागपूरच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व काँग्रेसच्या उमेदवारांचे प्रतिनिधी अनिल वडपल्लीवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे प्रकरण नेले. सहायक निर्णय अधिकारी आणि काँग्रेसच्या प्रतिनिधींनी सर्व प्रकार सांगितला. भाजपचे प्रतिनिधीही तिथे आले. त्यांनी प्रक्रिया योग्य असल्याचे सांगितले. मुदगल यांनी तुमच्याकडे असलेली यादी अधिकृत नाही. त्यावर प्रशासनाचा शिक्का नाही, असे म्हणत तक्रार निकाली काढली. काँग्रेसने मात्र यावर असमाधान व्यक्त केले. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली.
दुसरीकडे रामटेक लोकसभा मतदार संघातही काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी आक्षेपांचा भडीमार केला. मतमोजणीला सुरुवात होताच काही ईव्हीएम मशीनचे सील व्यवस्थित नाही. मशीन सुरू होत नाही, अशाप्रकारच्या अनेक तक्रारींचा भडीमार गजभिये यांनी केला. मतमोजणी संपेपर्यंत त्यांचे आक्षेप सुरूच होते.
जनतेचा कौल मान्य, पण मतदानाची चोरी होऊ नये - पटोले
मतदानाच्या वेळी उपयोगात आलेल्या ईव्हीएमची माहिती उमेदवाराला द्यायला पाहिजे होती ती दिली नाही. आमच्याकडे असलेली ईव्हीएमची माहिती आणि प्रत्यक्ष उपयोगात आणण्यात येत असलेले ईव्हीएम यात अंतर आहे. निवडणूक आयोगाची वेबसाईट आणि फेरीतील मतदान यात अंतर असल्याबाबतची तक्रार पटोले यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे मतदान केंद्रावरच केली. ईव्हीएममध्ये गडबड असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Bombarding from the Congress on the counting of objections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.