फेसबुकवर जुळले प्रेमाचे बंध, लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2023 09:07 PM2023-04-14T21:07:12+5:302023-04-14T21:07:46+5:30

Nagpur News फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर एका युवतीवर बलात्कार केल्याची घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Bonds of love matched on Facebook, physical relations with the lure of marriage | फेसबुकवर जुळले प्रेमाचे बंध, लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध

फेसबुकवर जुळले प्रेमाचे बंध, लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध

googlenewsNext

नागपूर : फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर एका युवतीवर बलात्कार केल्याची घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ एप्रिल २०२२ ते ७ एप्रिल २०२३ दरम्यान घडली आहे. पाचपावली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मुकेश शेखर इंदूरकर (३४, पंचशीलनगर, पाचपावली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मुकेश इंदूरकर आहे. फेसबुकवरून त्याची २३ वर्षांच्या प्रगतीच्या सोबत (बदललेले नाव) ओळख झाली. प्रगती ही बीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. त्यांच्यात नियमित बोलणे सुरु झाले. त्यानंतर त्यांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर दिले. आरोपी मुकेशने तिला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या घरी बोलावले. ती घरी आल्यावर त्याने जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने सलग वर्षभर तिला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर बलात्कार केला.

प्रगतीने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने लग्नास नकार देऊन तिला फ्रेंडशिप सुरु ठेवण्यास सांगितले; परंतु तिने लग्नाबाबत तगादा लावला असता आरोपीने तिला व तिच्या वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन हातबुक्कीने मारहाण करीत जबरी संभोग केला. त्यामुळे प्रगतीने पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पाचपावली पोलिसांनी आरोपी मुकेशविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (२) (एन), ३२३, ५०६ (ब) नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. आरोपी मुकेशला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक थारकर यांनी दिली.

 

.............

Web Title: Bonds of love matched on Facebook, physical relations with the lure of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.