नागपुरात पुस्तक व्यापाऱ्याची ३३ लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 08:36 PM2020-10-23T20:36:56+5:302020-10-23T20:41:50+5:30
Book dealer cheated, Crime news, Nagpur महालमधील पुस्तकांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची ३३ लाखांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महालमधील पुस्तकांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची ३३ लाखांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. कोतवाली पोलिसांनी आरोपी प्रशांत मधुसूदन गिरी (४०) रा. आर्णी, यवतमाळ आणि सुनील सुधाकर परभणे (४५) रा. पुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महालमधील नाईक रोडवर लीलाधर गिरी यांचे नारायण बुक डेपो आहे. आरोपी पुस्तक प्रकाशक आणि वितरण कंपनीशी निगडित आहेत. गिरी आरोपींच्या माध्यमातून देवाणघेवाण करतात. ४ मार्च २०१४ ते ३१ मार्च २०१५ दरम्यान लीलाधर गिरी यांनी आरोपींना ३३ लाख रुपये दिले. आरोपींनी ही रक्कम जमा करण्याऐवजी स्वत:च हडप केली. याची माहिती मिळाल्यानंतर लीलाधर गिरी यांनी पैशांसाठी तगादा लावला. आरोपींनी टाळाटाळ केली. त्यानंतर गिरी यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.