सुनील भाटियाकडून बुकी बाजारातील पत्ते खुले

By admin | Published: March 12, 2016 03:19 AM2016-03-12T03:19:15+5:302016-03-12T03:19:15+5:30

आंतरराष्ट्रीय बुकी सुनील भाटिया याने बुकी बाजारातील अनेक पत्ते उघड केल्याची चर्चा असून, यामुळे शहरातील बुकी बाजारात खळबळ निर्माण झाली आहे.

Bookie markets open from Sunil Bhatia | सुनील भाटियाकडून बुकी बाजारातील पत्ते खुले

सुनील भाटियाकडून बुकी बाजारातील पत्ते खुले

Next

नागपूर : आंतरराष्ट्रीय बुकी सुनील भाटिया याने बुकी बाजारातील अनेक पत्ते उघड केल्याची चर्चा असून, यामुळे शहरातील बुकी बाजारात खळबळ निर्माण झाली आहे. दुसरीकडे आयसीसीचा मौसम तोंडावर असताना भाटिया पोलिसांच्या कस्टडीत असल्यामुळे अनेक बुकींनी आजवरचे आपले बस्तान एकीकडून दुसरीकडे हलविल्याची माहिती आहे.
पावणेदोन कोटींच्या खंडणीसाठी कुख्यात बुकी अजय राऊत याच्या अपहरणाची कल्पना दिल्याच्या आरोपाखाली गुन्हेशाखेने सुनील भाटियाला अटक केली आहे. सध्या तो पीसीआरमध्ये आहे. आपला अपहरण आणि खंडणी प्रकरणाशी कवडीचा संबंध नसल्याचे भाटिया पोलिसांना सांगत आहे. मात्र, त्याने नागपूरच्या बुकी बाजाराचा आणि येथील बुकींच्या कनेक्शनचा विस्ताराने खुलासा केल्याचे समजते. त्याने इडिच्या फरार आरोपीसह मोठ्याच नव्हे तर शहरातील अनेक बुकींचे नाव चौकशीत घेतले असून, कुणाचे कुठे अड्डे आहेत, त्याचीही माहिती दिल्याचे समजते.
पोलिसांनी हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉर्इंटमध्ये टाकलेल्या जुगार अड्ड्याच्या धाडीची टीप भाटियाच्या पंटरकडूनच मिळाल्याची चर्चा आहे. या धाडीत पोलिसांनी राज अलेक्झांडर, गोलू तोतवाणी, विजय चुग आणि सादराणी या चार बुकींसह १३ जणांना अटक केली होती. पोलिसांनी कारवाईसाठी गडबड केली अन्यथा शहरातील अनेक बुकी पोलिसांना या अड्ड्यावर सापडले असते, असेही आता उघड झाले आहे. दरम्यान, पकडण्यात आलेला राज, गोलू आणि चुग शहरातील अनेक भागात क्रिकेटचे हायटेक सट्टा अड्डे चालवतात.
नाईसवाला अजय, आरजीबी आणि अन्य साथीदारांनी धरमपेठेतून बाजूलाच अड्डा हलविल्याचीही माहिती आहे. पोलीस आता त्यांच्या कशा मुसक्या बांधतात, त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bookie markets open from Sunil Bhatia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.