पुस्तके भांडारात पडून, वाहतूकदार गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:11 AM2021-09-16T04:11:27+5:302021-09-16T04:11:27+5:30

नागपूर : पहिले शैक्षणिक सत्र आता संपायला आले आहे. पण सर्व शिक्षा अभियानातून विद्यार्थ्यांना मिळणारी मोफत पाठ्यपुस्तके अजूनही ...

Books lying in the store, transporter Gul | पुस्तके भांडारात पडून, वाहतूकदार गुल

पुस्तके भांडारात पडून, वाहतूकदार गुल

Next

नागपूर : पहिले शैक्षणिक सत्र आता संपायला आले आहे. पण सर्व शिक्षा अभियानातून विद्यार्थ्यांना मिळणारी मोफत पाठ्यपुस्तके अजूनही मिळालेली नाही. पुस्तके केंद्र शाळेपर्यंत पोहचविण्यासाठी शिरीष कार्गो सर्व्हिसेस प्रा.लि. मुंबई या पुरवठादाराला राज्यभरात पुस्तके पोहचविण्यासाठी चार कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. पण कंत्राटदार गुल झाला असून, ७० टक्के पुस्तके अजूनही भांडारात पडून आहेत. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांची पुस्तकांसाठी ओरड सुरू झाली आहे.

विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेतील पुस्तके पोहचविलेली नाही, अशा तक्रारी संपूर्ण राज्यातून येत आहेत. नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यातून ८ लाख पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारतीकडे करण्यात आली होती. तालुक्यात १०० टक्के पुस्तके पोहचली आहेत. पण तालुक्यावरून केंद्रशाळेत अजूनही पुस्तके पोहचलेली नसल्याची माहिती आहे. शहरांमध्ये अजूनही पाठ्यपुस्तके पोहचलीच नसल्याची ओरड होत आहे. काही शाळांनी मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके घेऊन विद्यार्थ्यांना दिली आहेत. पण अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी पुस्तकेच परत केली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण पाठ्यपुस्तकाविनाच सुरू आहे.

- असा ठरला पुस्तकाच्या वाहतुकीचा दर

कंत्राटानुसार बालभारती भांडार ते तालुकास्तरापर्यंत पुस्तके पोहचविण्यासाठी प्रति मेट्रिक टन प्रतिकिलोमीटर ११.७५ रुपये दर निश्चित करण्यात आला. तर तालुकास्तरापासून केंद्र शाळेपर्यंत प्रतिकिलोग्रॅम दर १.२० रुपये निश्चित करण्यात आला. १ जून रोजी हा करार झाला असून, पुस्तके कधीपर्यंत पोहचावी, यासंदर्भात कालावधी निश्चित दिलेला नाही.

- कंत्राटदाराकडे वाहने नाही, काम करणारे मजूर नाही

यापूर्वी पुस्तके तालुकास्तरावर पोहचली की बीईओ गाडी करून पुस्तके शाळेपर्यंत पोहचवीत होते. त्यासाठीचा वाहतुकीचा खर्च शिक्षण विभाग बीईओंना देत होता. परंतु यावेळी बालभारतीच्या भांडारापासून केंद्र शाळेपर्यंत पुस्तके पोहचविण्याचे कंत्राट राज्यस्तरावरून झाला. अशात कंत्राटदाराकडे तालुकास्तरावरून केंद्रशाळेत पुस्तके पोहचविण्यासाठी यंत्रणाच नाही. त्याच्याकडे वाहने उपलब्ध नाही. काम करणारे मजूर नाही. त्यामुळे ग्रामीण भागात पुस्तके तालुक्याच्या ठिकाणीच पडून आहेत. सर्वच बीईओंनी कंत्राटदारांना पुस्तके का पोहचली नाही, यासंदर्भात कंत्राटदाराला पत्रही दिले आहे. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे व कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षण धोक्यात आले आहे. यावर्षी कंत्राटदाराला शाळेपर्यंत पुस्तके पोहचविण्याचा कंत्राट का देण्यात आला? हे देखील संशयास्पद आहे. यामागे अधिकारी व कंत्राटदारामध्ये नफेखोरी झाल्याचेच दिसते आहे. आधीच विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून दूर जात आहेत व त्यात तीन महिन्यापासून विद्यार्थ्यांकडे पुस्तकेच पोहचली नाही, दुर्दैव आहे.

अनिल शिवणकर, पूर्व विदर्भ संयोजक, भाजप शिक्षक आघाडी

Web Title: Books lying in the store, transporter Gul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.