पालकांना बोलावूनही बंद ठेवले पुस्तकांचे दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:10 AM2021-07-14T04:10:49+5:302021-07-14T04:10:49+5:30

नागपूर : सदर येथील मनपा चिकित्सालयापुढे एका नामांकित शाळेला लागून पुस्तकाची दुकान आहे. या दुकानात पुस्तक खरेदीसाठी येणारे पालक ...

The bookstore was closed even after calling the parents | पालकांना बोलावूनही बंद ठेवले पुस्तकांचे दुकान

पालकांना बोलावूनही बंद ठेवले पुस्तकांचे दुकान

googlenewsNext

नागपूर : सदर येथील मनपा चिकित्सालयापुढे एका नामांकित शाळेला लागून पुस्तकाची दुकान आहे. या दुकानात पुस्तक खरेदीसाठी येणारे पालक रिकाम्या हाताने परतत आहेत.

शाळेकडून पुस्तके घेण्यास सांगितले जात आहे. परंतु, दुकान बंद ठेवले जात आहे. काही निराश पालक सदर येथील अन्य दुकानांतून संबंधित वर्गाच्या अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदीसाठी केले. परंतु, तेथे ती पुस्तके त्यांना मिळाली नाहीत. बंद असलेल्या दुकानाच्या विक्रेत्याला काही पालकांनी फोन करून विचारले असता, त्याने पुस्तकांचा संपूर्ण सेट खरेदी करावा लागेल, असे सांगितले. मात्र, दुकान कधी उघडणार हे स्पष्ट केले नाही. त्यामुळे, पालक संभ्रमात आहेत. मुलांचे ऑनलाइन क्लास सुरू झाले आहेत. त्यामुळे बहुतांश पालकांनी दुसऱ्या विद्यार्थ्यांकडून पुस्तके घेतली आहेत. याच दरम्यान शाळेकडून मुलांना जुने पुस्तकं जमा करण्याचे निर्देश दिले जात आहेत.

.............

Web Title: The bookstore was closed even after calling the parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.