मुळक देणार जिल्हा काँग्रेसला बूस्ट
By admin | Published: June 30, 2016 03:07 AM2016-06-30T03:07:25+5:302016-06-30T03:07:25+5:30
गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचे भिजत घोंंगडे होते. तो गुंता आता सुटला आहे.
कार्यकर्त्यात उत्साह : निवडणुकीच्या तोंडावर पॉवरफुल अध्यक्ष
नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचे भिजत घोंंगडे होते. तो गुंता आता सुटला आहे. अ.भा. काँग्रेस कमिटीने जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या नावाची घोषणा केली आहे. जि.प. आणि पं.स. च्या निवडणुका तोंडावर असताना जिल्हा काँग्रेसला मुळक यांच्या रूपात ‘पॉवरफुल’ अध्यक्ष मिंळाल्याने काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे.
राजेंद्र मुळक हे राज्यमंत्री राहिले आहेत. स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते जिंकून आले होते. जिल्ह्यातील ४ ते ५ मतदार संघामध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. मुळक हे ‘इलेक्शन स्ट्रॅटजी’चे मास्टर मानल्या जातात. गनिमीकाव्याने निवडणुका कशा लढवायच्या, याचे ते मास्टर आहेत. त्यांनी हात टाकलेली निवडणूक सहसा हरत नाहीत, असे मानले जाते.
त्यामुळे त्यांच्या निवडीने जिल्ह्यात निश्चितच काँग्रेसची ताकद वाढणार आहे. येत्या आठ महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. अशा वेळी मुळक हे ताकदीने उमेदवारांच्या पाठीशी उभे राहतील. तेव्हा त्याचा फायदा उमेदवाराला आणि पक्षाला होईल. गेल्या निवडणुकीमध्ये मुळक यांनी नागपूर-पश्चिमची तिकीट मागितली होती. यानंतर मुळक यांना कामठीत जावे लागले. बावनकुळे यांच्याकडून ते पराभूत झाले. यानंतर वर्षभराने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आली.