कर्जदाराची रक्कम परस्पर वळती करून घेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:10 AM2021-02-23T04:10:26+5:302021-02-23T04:10:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - बिल्डर आणि बँक अधिकाऱ्यांनी संगनमत करून कर्जदाराची रक्कम त्याच्या खात्यातून परस्पर वळती करून घेतली. ...

The borrower's money was reciprocated | कर्जदाराची रक्कम परस्पर वळती करून घेतली

कर्जदाराची रक्कम परस्पर वळती करून घेतली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - बिल्डर आणि बँक अधिकाऱ्यांनी संगनमत करून कर्जदाराची रक्कम त्याच्या खात्यातून परस्पर वळती करून घेतली. ४ वर्षांनंतर ही बनवाबनवी उघड झाल्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणात शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या धरमपेठ शाखा तसेच जयकोद्दीन मिनाहुद्दीन सिद्दीकी, इरफान अमिनउल्ला खान, रमन रमेश महेशकर, मोहम्मद अमजद अहमद शफिक (ड्रीम लाईन बिल्डकॉम प्रा. लि.), घनश्याम केवजी कारेमोरे आणि देवराव बाबूलाल इंगोले (रा. गणेशनगर) यांचा आरोपी म्हणून सहभाग आहे.

नवीन रामेश्वर फुलसुंगे (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी बिल्डर सिद्दीकी, खान आणि त्यांच्या साथीरांकडून ४ जानेवारी २०१७ ला फ्लॅट विकत घेण्याचा साैदा केला. त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या धरमपेठ शाखेत २४ लाख, ५० हजारांचे कर्ज प्रकरण सादर केले. बँक अधिकाऱ्यांनी त्यांना २६ लाखांचे कर्ज मिळावे म्हणून अर्ज करण्यास सुचविले. त्यानंतर कोऱ्या अर्जावर सह्या घेतल्या. नंतर मात्र १९ लाख, ६० हजारांचे कर्ज मंजूर झाल्याचे कळविले. त्यामुळे हे आणि वरचे ४ लाख, ९० हजार रुपये रोख स्वरूपात फुलसुंगे यांनी आरोपी बिल्डरला दिले. तिकडे फुलसुंगे यांना अंधारात ठेवून बँक अधिकारी आणि बिल्डरने फुलसुंगे यांच्या खात्यातून परस्पर ६ लाख ४० हजार रुपये आपल्या खात्यात वळते करून घेतले. बँकेने ही माहिती दडवून ठेवली आणि नंतर कर्ज परतफेडीचे हप्ते सुरू झाल्यानंतर बँक अधिकारी आणि बिल्डरने संगनमत करून आपल्या नावाने ६ लाख, ४० हजारांच्या रकमेची अफरातफर केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. परिणामी फुलसुंगे यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर या प्रकरणात फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी शनिवारी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---

अद्याप अटक नाही

या प्रकरणात बिल्डर आणि त्याचे साथीदार आरोपी निष्पन्न झाले असले तरी बँकेच्या नेमक्या कोणत्या अधिकाऱ्याचा फसवणुकीत सहभाग आहे, ते स्पष्ट झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी तूर्त कुणालाही अटक केलेली नाही. चाैकशी सुरू असल्याचे पोलीस सांगत आहेत.

----

Web Title: The borrower's money was reciprocated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.