अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2016 03:03 AM2016-10-06T03:03:36+5:302016-10-06T03:03:36+5:30

शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्यासह दोघांना आपला जीव गमवावा लागला.

Both of them died in an accident | अपघातात दोघांचा मृत्यू

अपघातात दोघांचा मृत्यू

Next

वाहनाच्या वेगाने घेतला जीव : तेलंखेडी व हिंगणा रोडवर अपघात
नागपूर : शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्यासह दोघांना आपला जीव गमवावा लागला. दुचाकी वाहनाच्या भरधाव वेगाने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते.
पहिली घटना तेलंखेडी येथे घडली. अनिकेत हिरणवार (२१) रा. गवळीपुरा धरमपेठ हा बुधवारी सकाळी ७.२५ वाजता तेलंखेडी येथील त्याचा मित्र कार्तिक रणावरे याच्यासोबत बाईकने जात होता. बाईक भरधाव वेगात असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठासमोर एका ट्रकने बाईकला धडक दिली.
यात अनिकेत आणि कार्तिक गंभीर जखमी झाले. अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक तेथून पळून गेला. काही वेळातच स्टंट दाखवण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याचे वृत्त पसरले. अंबाझरी पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. अंबाझरी ठाण्याचे ठाणेदार अतुल सबनीस यांनी मात्र हा अपघात स्टंट दाखवण्याच्या प्रयत्नातून झाला नसल्याचे स्पष्ट केले.
अनिकेत बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. तर कार्तिक बीसीसीए प्रथम वर्षाला शिकतो. घटनेच्यावेळी त्याच्यासोबत हितेश ढुमणे हा सुद्धा होता. तो दुसऱ्या बाईकवर होता. विचारपूस केली असता हितेशने नुडल्स खाण्यासाठी फुटाळा चौपाटी येथे गेल्याचे सांगितले. फुटाळा चौपाटीवर सकाळच्या वेळी बाईकस्वार स्टंटबाजी करताना आढळून येतात. त्यांच्यामुळे रस्त्यांना ये-जा करणारे आपला जीव मुठीत धरून चालत असतात. त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी सुद्धा केली जात आहे.
दुसरा अपघात दुपारी १२ वाजता हिंगणा रेडवर सुतगिरणीजवळ घडला. विजय द्वारकाप्रसाद तिवारी (४७) रा. बाजीप्रभू चौक, रामनगर असे मृताचे नाव आहे. तिवारी प्रॉपर्टी डीलर होते. ते दुचाकीने दुपारी १२ वाजता हिंगण्यावरून परत येत होते. त्यांच्यासमोर मधुसुदन दरक हे दुचाकीने जात होते. तिवारी यांनी दरक यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून समोर निघण्याच्या प्रयत्न केला. या प्रयत्नात दरक यांच्या दुचाकीचा तिवारी यांच्या बाईकला कट लागला.
दोघेही वाहनासह खाली पडले. त्याचवेळी तिवारी हे मागून आलेल्या एम.एच./४०/ए.के. ७९९१ क्रमांकाच्या ट्रकमध्ये सापडले. यात दोघेही जखमी झाले. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिवारी यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Both of them died in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.