नागपुरात अनियंत्रीत ट्रकची दोघींना धडक, एकीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 01:06 AM2019-03-24T01:06:54+5:302019-03-24T01:07:38+5:30

अनियंत्रीत ट्रकने दोन मैत्रीणींना उडवले. त्यानंतर हा ट्रक एका टपरीला धडकला. यामुळे एका युवतीचा मृत्यू झाला तर दुसरी एक युवती आणि एक युवक गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री ७.३० च्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Both of them hit by the uncontrolled truck in Nagpur, the death of one | नागपुरात अनियंत्रीत ट्रकची दोघींना धडक, एकीचा मृत्यू

नागपुरात अनियंत्रीत ट्रकची दोघींना धडक, एकीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देयुवतीसह दोघे गंभीर जखमी : कळमन्यात अपघातानंतर तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनियंत्रीत ट्रकने दोन मैत्रीणींना उडवले. त्यानंतर हा ट्रक एका टपरीला धडकला. यामुळे एका युवतीचा मृत्यू झाला तर दुसरी एक युवती आणि एक युवक गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री ७.३० च्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
जय अंबे नगरात राहणारी पूजा गंगाधर खापेकर (वय २१) आणि पल्लवी केशव नागपुरे (वय २०) या दोन मैत्रीणी एका केबलच्या कार्यालयात काम करतात. शनिवारी रात्री काम आटोपून त्या घराकडे पायी जात होत्या. पूजाच्या घरापासून काही अंतरावर दूध गंगा वचन कंपनीच्या भरधाव ट्रकने (एमएच ४०/ बीजी ५०३२) च्या चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून पूजा आणि पल्लवीला धडक मारली. त्यानंतर एका टपरीत अनियंत्रीत ट्रक शिरला. यावेळी टपरीत गुड्डू शाहू बसून होता. तो गंभीर जखमी झाला. तेथे बसून असलेले काही लोक जीवाचा धोका लक्षात घेऊन पळून गेले. त्यामुळे ते बचावले. या अपघातानंतर तेथे मोठा तणाव निर्माण झाला. अपघातानंतर आरोपी ट्रकचालक उडी मारून पळून गेला. जखमी तिघांनाही डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी पूजा नागपुरेला मृत घोषित केले. पल्लवी आणि गुड्डूवर उपचार सुरू आहेत. माहिती कळताच कळमना पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले. आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा शोध घेतला जात आहे.

 

Web Title: Both of them hit by the uncontrolled truck in Nagpur, the death of one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.