नागपूर मॅरेथॉनसाठी बॉक्सर मेरी कोम येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:17 AM2017-11-10T01:17:29+5:302017-11-10T01:17:44+5:30
शहराची ओळख बनलेल्या ‘नागपूर मॅरेथॉन’चे २६ नोव्हेंबर रोजी आयोजन होत आहे. या स्पर्धेसाठी पाच वेळेची विश्व चॅम्पियन आणि काल आशियाई बॉक्सिंगची....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराची ओळख बनलेल्या ‘नागपूर मॅरेथॉन’चे २६ नोव्हेंबर रोजी आयोजन होत आहे. या स्पर्धेसाठी पाच वेळेची विश्व चॅम्पियन आणि काल आशियाई बॉक्सिंगची सुवर्ण जिंकणारी बॉक्सर मेरी कोम येणार आहे. मॅरेथॉनचे आयोजन ५ किलोमीटर (फन वॉक-जॉग रन), १० किलोमीटर (एन्ड्यूरन्स रन) तसेच २१ किलोमीटर (आॅरेंज सिटी रन) आदी प्रकारात होईल. पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगळुरु, दमण, केरळ, बडोदा आणि अन्य शहरातील धावपटू सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे संचालक मितेश रांभिया यांनी ७५०० पेक्षा अधिक धावपटू सहभागी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. आतापर्यंंत तीन हजारावर धावपटूंनी पंजियन केल्याचे सांगून रांभिया म्हणाले,‘ सिव्हील लाईन्स येथील नाशिकराव तिरपुडे महाविद्यालय प्रांरणातून सर्व शर्यतींना सुरुवात होईल. अॅडव्हेंचर्स अॅन्ड यू तर्फे आयोजित या स्पर्धेला नागपूर रनर्स अकादमी, सरस्वती विद्यालय अॅल्युमिनी असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेचे सहकार्य लाभले आहे.