महाराष्ट्राच्या बॉक्सर्सची उपांत्य फेरीत धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 11:39 AM2018-09-06T11:39:01+5:302018-09-06T11:39:57+5:30
यजमान महाराष्ट्राच्या सात बॉक्सर्सनी सिव्हिल लाईन्स येथील राणीकोठीमध्ये खेळल्या जात असलेल्या मुलींच्या पहिल्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेत बुधवारी आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरीत विजय साकारत उपांत्य फेरी गाठली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यजमान महाराष्ट्राच्या सात बॉक्सर्सनी सिव्हिल लाईन्स येथील राणीकोठीमध्ये खेळल्या जात असलेल्या मुलींच्या पहिल्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेत बुधवारी आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरीत विजय साकारत उपांत्य फेरी गाठली.
अंतिम चारमध्ये स्थान मिळविणाऱ्या बॉक्सर्समध्ये साक्षी वघिरे, श्रेया सावंत, देविका घोरपडे, सिमरन वर्मा, स्वप्ना, सना आणि मधुरा पाटील यांचा समावेश आहे. ३८-४० किलो वजन गटात साक्षी वघिरेने आंध्र प्रदेशच्या साफियाविरुद्ध रेफ्रीने लढत थांबविल्यानंतर विजय साकारला. ४२-४४ वजन गटात श्रेया सावंतने नुसरतविरुद्ध ५-० ने एकतर्फी विजय नोंदवला. ४४-४६ गटात देविका घोरपडेने पंजाबच्या राजवीर कौरचा ५-० ने पराभव केला. ४६-४८ किलो वजन गटात सिमरन वर्माने दीपिकाचा ५-० ने पराभव केला. याच वजन गटात स्वप्नाने पंजाबच्या कुलदीप कौरचा ५-० ने धुव्वा उडवला.
५२-५४ वजन गटात मधुरा पाटीलने आसामच्या सुमिताचा पराभव केला. सनाने ओडिशाच्या नयनाविरुद्ध सरशी साधत उपांत्य फेरी गाठली. महाराष्ट्राच्या अन्य तीन बॉक्सर्सला उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यात प्रतीक्षा साळुंखे, खुशी जाधव आणि विशाखा यांचा समावेश आहे.
निकाल (महाराष्ट्र) : ३२-३४ किलो गट :- प्रतीक्षा साळुंखे पराभूत विरुद्ध निधी (उत्तर प्रदेश- रेफ्रीने लढत थांबविली), ३६-३८ किलो गट :- खुशी जाधव पराभूत विरुद्ध वेनिका चानू (मणिपूर) १-४, ३८-४० किलो : साक्षी वघिरे (महाराष्ट्र) मात साफिया (आंध्र प्रदेश, रेफ्रीने लढत थांबविली). ४२-४४ किलो :- श्रेया सावंत (महाराष्ट्र) मात नुसरत ५-०. ४४-४६ किलो :- देविका घोरपडे (महाराष्ट्र) मात राजवीर कौर (पंजाब) ५-०. ४६-४८ किलो : सिमरन वर्मा (महाराष्ट्र) मात दीपिका (आंध्र) ५-०, स्वप्ना (महाराष्ट्र) मात कुलदीप कौर (पंजाब) ५-०. ५२-५४ किलो :- मधुरा पाटील (महाराष्ट्र) मात सुमिता (आसाम). ५७-६० किलो :- सना (महाराष्ट्र) मात नयना (ओडिशा, रेफ्रीने लढत थांबविली).