प्रेयसीचा मोबाईल फोडून प्रियकराने केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:34 PM2018-10-26T23:34:30+5:302018-10-26T23:35:11+5:30

लग्नास नकार दिला म्हणून एका तरुणीचा (वय २२) मोबाईल फोडून एका व्यक्तीने तिला मारहाण केली. तिचा विनयभंगही केला. २२ आॅक्टोबरच्या सकाळी ११.३० ला ही घटना घडली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गगनदीप बलजिंदरसिंग जग्गी (वय ३५, रा. बाबा बुद्धाजीनगर, गुरुद्वाराजवळ) नामक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Boyfriend assaulted girlfriend in nagpur | प्रेयसीचा मोबाईल फोडून प्रियकराने केली मारहाण

प्रेयसीचा मोबाईल फोडून प्रियकराने केली मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देलग्नास नकार दिला म्हणून विनयभंग : नागपुरातील पाचपावलीतील जग्गीविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नास नकार दिला म्हणून एका तरुणीचा (वय २२) मोबाईल फोडून एका व्यक्तीने तिला मारहाण केली. तिचा विनयभंगही केला. २२ आॅक्टोबरच्या सकाळी ११.३० ला ही घटना घडली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गगनदीप बलजिंदरसिंग जग्गी (वय ३५, रा. बाबा बुद्धाजीनगर, गुरुद्वाराजवळ) नामक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गगनदीपसिंग जग्गी आणि तक्रार करणाऱ्या तरुणीचे मैत्रीसंबंध होते. त्याने तो विवाहित असल्याचे तिच्यापासून लपवून ठेवले होते. तो विवाहित असल्याचे माहीत झाल्याने तरुणीने त्याच्यासोबत मैत्रीसंबंध तोडले. २२ आॅक्टोबरला सकाळी सीताबर्डीतील अहिंसा चौकात ती दिसताच त्याने तिला आपल्या कारमध्ये बसवले. त्याने आपली कार अमरावती मार्गाने काढली. वाटेत गप्पा करीत असताना गगनदीपसिंगने तिला ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’, असे म्हटले. तो विवाहित असल्याचे कळाल्याने तरुणीने त्याला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या जग्गीने तिच्यासोबत वाद घातला. अमरावती मार्गावर एका ठिकाणी कार थांबवून तरुणीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तो जमिनीवर आपटून फोडला. तिने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाणही केली. तिने या घटनेची तक्रार सीताबर्डी ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी मारहाण करून विनयभंग केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Boyfriend assaulted girlfriend in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.