ब्राम्हणवादाला खतपाणी घालणाऱ्या महिलाच! नंदकुमार बघेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 09:18 PM2019-12-27T21:18:45+5:302019-12-27T21:22:59+5:30

जुन्या रूढीपरंपरांचा वारसा पुढे नेण्यात महिलाच अग्रेसर राहिल्या आहेत. ब्राह्मणवादी परंपरांना खतपणी घालण्याचे प्रमुख कार्य महिलांनीच केले आहे.

Brahminism is the only woman who promoted ! Nandakumar Baghel | ब्राम्हणवादाला खतपाणी घालणाऱ्या महिलाच! नंदकुमार बघेल

ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या समारोपीय सत्रात मार्गदर्शन करताना नंदकुमार बघेल, व्यासपीठावर बबनराव तायवाडे, विवेककुमार वासनिक, विजया मारोतकर व अन्य

Next
ठळक मुद्देओबीसी महिला साहित्य संमेलनाचा समारोपरूढीपरंपरांचा वारसा स्त्रियांनी नाकारावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुन्या रूढीपरंपरांचा वारसा पुढे नेण्यात महिलाच अग्रेसर राहिल्या आहेत. ब्राह्मणवादी परंपरांना खतपणी घालण्याचे प्रमुख कार्य महिलांनीच केले आहे. त्यामुळे, आधी हा वारसा महिलांनी नाकारावा. त्याची सुरुवात नागपुरातून या संमेलनाच्या निमित्ताने झाली असल्याची भावना छत्तीसगड येथील ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार बघेल यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्यावतीने बजाजनगर येथील कस्तुरबा भवन येथे पार पडलेल्या द्विदिवसीय पहिल्या ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या समारोपीय सत्रात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर छत्तीसगड येथील राजदा संपत्ती मंडळाचे अध्यक्ष विवेक वासनिक, ज्येष्ठ पत्रकार सुनील खोब्रागडे, ओबीसी लेखिका रेखा ठाकूर, डॉ. शरयू तायवाडे, ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे उपस्थित होते.
रूढीपरंपरा स्त्रियांनी नाकारल्या तरच त्या संपुष्टात येतील. या संमेलनाच्या निमित्ताने तसे आशावादी चित्र निर्माण झाले आहे. ज्या ब्राह्मणवादी विचारधारेने महिलांना अजूनही मंदिर प्रवेश नाकारला, त्याच विचाराचा वारसा टिकविण्याचे कारण नाही. जगात रामासारखी दुसरी दुष्ट व्यक्ती नाही. ज्या रामाने स्वत:च्या पत्नीला सन्मानजनक वागणूक दिली नाही, तो आदर्श कसा होऊ शकतो, असा सवालही बघेल यांनी यावेळी उपस्थित केला. ‘युद्ध नको बुद्ध हवा’ या घोषणेची गर्जना ओबीसी महिलांनी संपूर्ण देशात करावी आणि खऱ्या क्रांतीला सुरुवात करावी, असे आवाहन बघेल यांनी यावेळी केले.
संमेलनाध्यक्ष विजया मारोतकर यांनी समारोपीय भाषणात सर्वमताने ठराव पारित केल्याचे जाहीर केले. अ‍ॅड. समीक्षा गणेशे आणि अ‍ॅड. रेखा बाराहाते यांनी ठरावांचे वाचन केले. प्रा. माधुरी गायधनी यांनी संचालन केले.
यावेळी, सुषमा भड, अरुणा भेंडे, प्रज्वला तट्टे, नंदा देशमुख, अ‍ॅड. अंजली साळवे, कल्पना मानकर, अवंतिका लेकुरवाळे, प्रा. संध्या राजूरकर, प्रा. माधुरी गायधनी, निर्मला मानमोडे, उषा देशमुख, मीना भागवतकर, अर्चना बरडे, अरुणा भोंडे, अनिता ढेंगरे, साधना बोरकर, प्रा. डॉ. वीणा राऊत, प्रांजल ताल्हन, लक्ष्मी सावरकर, कुमुद वर्षे, उषा माहुरे, उज्वला महाले, शुभांगी घाटोळे, प्रांजल वाघ उपस्थित होते.

बाबासाहेबांनी दिला दलितांना राजसन्मान - विवेककुमार वासनिक
डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच दलिताना राजसन्मान मिळत आहे. छत्तीसगडमध्ये हे प्रकर्षाने जाणवते. संविधानाचे विवेचन करण्याची क्षमता राज्यकर्त्यांमध्ये नाही. महिलाच समाजाला पुढे नेणार असून, याची ठिणगी या संमेलनातून पडली असल्याचे विवेककुमार वासनिक यावेळी म्हणाले.

साहित्यातून वास्तववादी लिखाण व्हावे - शरयू तायवाडे
संत साहित्यासह आधुनिक साहित्यातही महिलांनी मोठे लिखाण केले आहे. वर्तमानातही वास्तववादी लिखाणावर महिलांनी भर द्यावा. प्रस्थापितांच्या व्यासपीठावर बहुजन महिलांना व्यक्त होण्याची संधी दिली जात नसल्याने, ओबीसी महिलांनी स्वत:चे व्यासपीठ निर्माण करावे, असे आवाहन डॉ. शरयू तायवाडे यांनी यावेळी केले.

Web Title: Brahminism is the only woman who promoted ! Nandakumar Baghel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.