कामगारांच्या नुकसानीवर मंथन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:12 AM2021-08-23T04:12:16+5:302021-08-23T04:12:16+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : एनसीडब्ल्यूए-१० मध्ये वेकाेलि कामगारांचे माेठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीवर मंथन करणे अत्यावश्क ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : एनसीडब्ल्यूए-१० मध्ये वेकाेलि कामगारांचे माेठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीवर मंथन करणे अत्यावश्क आहे. एनसीडब्ल्यूए-११ च्या वेतन समझाेत्यातून इंटकला मुद्दाम बाहेर ठेवण्यात आले आहे, असे प्रतिपादन इंटकचे वरिष्ठ नेते हाजी अब्रार सिद्दिकी यांनी सावनेर येथे आयाेजित वेकाेलि कामगार संसदमध्ये केले.
ही कामगार संसद वेकाेलिच्या सावनेर खाण क्रमांक-२ व ३ च्या प्रवेशद्वाराजवळ रविवारी (दि. २२) पार पडली. या संसदमध्ये वेकाेलि कामगारांना दिल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक सोयी-सुविधा, वेल्फेअर अंतर्गत करण्यात येणारी विविध विकासकामे, त्यात कामगारांच्या हितांना प्राथमिकता देणे यासह अन्य महत्त्वाचे मुद्दे व समस्यांवर चर्चा करण्यात आली. कामगारांच्या हितासाठी इंटक नेहमीच अग्रेसर व आक्रमक राहिल्याचेही या वेळी अतिथींनी सांगितले.
एनसीडब्ल्यूए-११ च्या वेतन समझाेत्यातून इंटकला वगळण्यात आले असले तरी प्रकरण विशेष न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने कामगारांना नक्कीच न्याय मिळणार असल्याचा विश्वास राष्ट्रीय कोळसा खाण मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री एस.क्यू. जमा यांनी व्यक्त केला. या वेळी व्यासपीठावर इंटकचे वीरेंद्र सिंह, नदीम जमा, अशोक निंबाळकर, बहराइच सिंग, रॅड्रिक्स जेम्स, दीपक कटारे, प्रशांत सातपुते, रमेश बावणे, प्रेम नारायण सिंग, अन्वर शेख, विजय बल्की, प्रकाश जोगी, सोमनाथ यादव, मधुकर पाटोळे, दुर्गाप्रसाद कैथल, जयंत साने, राजेश मिश्रा, राजेश भारद्वाज, भाऊ गोतमारे, लक्ष्मण धोटे उपस्थित हाेते. या संसदेला कामगारांनी माेठ्या संख्येने हजेरी लावली हाेती.