मेट्रो रिजनच्या आराखड्यावर मंथन

By Admin | Published: March 14, 2015 02:44 AM2015-03-14T02:44:14+5:302015-03-14T02:44:14+5:30

नागपूर महानगर क्षेत्र विकास योजनेचा आराखडा कसा राहील. यात रहिवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सार्वजनिक वापराच्या जागा, विविध क्षेत्रासाठी आरक्षित असलेल्या ....

Brainstorm on the Metro Region Plan | मेट्रो रिजनच्या आराखड्यावर मंथन

मेट्रो रिजनच्या आराखड्यावर मंथन

googlenewsNext

नागपूर : नागपूर महानगर क्षेत्र विकास योजनेचा आराखडा कसा राहील. यात रहिवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सार्वजनिक वापराच्या जागा, विविध क्षेत्रासाठी आरक्षित असलेल्या जमिनीसंदर्भात लोकांच्या शंका व तक्रारींचे निराकरण, सूचना जाणून घेण्यासंदर्भात कॉन्फेडरेशन आॅफ, रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन आॅफ इंडिया (क्रेडाई) यांच्या सूचनेवरून नासुप्रतर्फे नैवेद्यम सभागृहात शुक्र वारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आर्किटेक्चर असोसिएशन यांच्यासह विविध व्यापार व उद्योग सघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नागपूर महानगर क्षेत्रामध्ये (एनएमए) शहराच्या हद्दीबाहेरील ३५८७ वर्ग कि.मी.क्षेत्रातील ९ तालुक्यातील ७२१ गावांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या भागातील लोकसंख्या १०.६२ लाख आहे. या क्षेत्राचा संतुलित आणि नियोजनबद्ध विकास करण्याचे अधिकार सुधार प्रन्यासकडे सोपवण्यात आले. त्यानुसार पुढील २० वर्षासाठी ही विकास योजना तयार करण्यात आली आहे.
औद्योगिक विकासासोबतच कृषी विकासही तितकाच महत्त्वाचा आहे. ही बाब विचारात घेता कृषीसाठी क्षेत्र राखीव दर्शविण्यात आले आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यातील रहिवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, आरक्षित जागा, शेतीची जमीन या संदर्भात विकास आराखड्याची लोकांना महिती व्हावी, सोबतच यावरील शंका व तक्रारींचे निराकरण व्हावे, या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती क्रे डाईचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत सरोदे यांनी दिली. विकास आराखड्यासंदर्भात सूचना व तक्रारी २६ एप्रिलपर्यत स्वीकारल्या जाणार आहेत. मेट्रो रिजनच्या कार्यालयात त्या स्वीकारल्या जातील. त्यावर सुनावणी होऊन अंतिम आराखडा तयार केला जाणार असल्याची माहिती मेट्रो रिजनच्या अधिकाऱ्यांनी दिली.
जुन्या व प्रस्तावित विकास आराखड्यात असलेला बदल व प्रस्तावित योजनांची उपस्थितांना माहिती देण्यात आली. क्रेडाईचे सचिव अनिल नायर, उपाध्यक्ष महेश अडवाणी, विजय दर्गन, अशोक चांडक, सिद्धार्थ सराफ आर्किटेक्चर असोसिएशनचे पदाधिकारी अशोक मोटवा, परमजीत आहुजा आदींनी शंका उपस्थित केल्या तसेच उपयुक्त सूचना मांडल्या. अधीक्षक अभियंता (ंंमेट्रो) प्रवीण किडे, संचालक सुजाता कडू यांनी उपस्थितांच्या शंका व तक्रारी जाणून त्याचे निराकरण केले. (प्रतिनिधी)

Web Title: Brainstorm on the Metro Region Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.