सहा महिन्याच्या वाघाच्या बछड्यास ताब्यात घेण्याचा धाडसी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 01:09 AM2019-05-03T01:09:32+5:302019-05-03T01:11:17+5:30

बुधवारी सायंकाळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका ३० किलो वजनाच्या आणि सहा महिन्याच्या मादा बछड्यास रॅपिड रिस्पॉन्स युनिट(आरआरटी)ने ब्रह्मपुरी वन प्रभागात यशस्वीरीत्या बेशुद्ध करून ताब्यात घेतले. सहा महिन्याच्या मादा बछड्याला बेशुद्ध करण्यासाठी औषधांचा डोस किती द्यावा, हे जोखमीचे काम होते. परंतु डॉक्टरांनी आपल्या अनुभवानुसार योग्य मात्रा देऊन बेशुद्ध केले. गुरुवारी सकाळी या बछड्यास नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालय आणि रेस्क्यू सेंटरमध्ये उपचारासाठी आणण्यात आले.

The brave attempt to capture the six-month tiger cub | सहा महिन्याच्या वाघाच्या बछड्यास ताब्यात घेण्याचा धाडसी प्रयत्न

सहा महिन्याच्या वाघाच्या बछड्यास ताब्यात घेण्याचा धाडसी प्रयत्न

Next
ठळक मुद्देरॅपिड रिस्पॉन्स टीमचे यश : गोरेवाडा प्राणी संग्रहालयात दाखल

संजय रानडे/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारी सायंकाळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका ३० किलो वजनाच्या आणि सहा महिन्याच्या मादा बछड्यास रॅपिड रिस्पॉन्स युनिट(आरआरटी)ने ब्रह्मपुरी वन प्रभागात यशस्वीरीत्या बेशुद्ध करून ताब्यात घेतले. सहा महिन्याच्या मादा बछड्याला बेशुद्ध करण्यासाठी औषधांचा डोस किती द्यावा, हे जोखमीचे काम होते. परंतु डॉक्टरांनी आपल्या अनुभवानुसार योग्य मात्रा देऊन बेशुद्ध केले. गुरुवारी सकाळी या बछड्यास नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालय आणि रेस्क्यू सेंटरमध्ये उपचारासाठी आणण्यात आले.
याबाबत ‘लोकमत’शी बोलताना उपवनसंरक्षक कुलराज सिंग म्हणाले, गस्त घालताना आमच्या फॉरेस्ट गार्डला हा बछडा (मादी) आढळला. गोसेखुर्दच्या कालव्यामध्ये कम्पार्टमेंट २५२ डोंगरगाव बीट, सिंदेवाही परिक्षेत्रात तो बसलेला दिसला. दुपारी २ वाजता सहायक वनसंरक्षक रामेश्वरी बोंगाले, रेंज फॉरेस्ट आॅफिसर गोंड, बीट गार्ड जुडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या बछड्याच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झालेली होती. तिच्या मागील पायाच्या बोटाला जखम झाली होती. तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमला पाचारण करण्यात आले. पशुवैद्यकीय डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी सायंकाळी ६ वाजता बेशुद्ध करण्यासाठी डॉट मारला. त्यानंतर बछड्यास खांद्यावर टाकून ४० फूट उंचाच्या कॅनलमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर या बछड्यास गोरेवाडा प्राणी संग्रहालय आणि रेस्क्यू सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. जखमी झाल्यामुळे वाघिणीने या बछड्याला सोडून दिले का यावर उपवनसंरक्षक सिंग म्हणाले, याबाबत सध्या काहीच माहिती नाही. आमच्या गार्डला हे बछडे दिसले. वन विभागाच्या कॅमेऱ्यातील चित्रानुसार इतर बछड्यांपैकी हे बछडे कमकुवत होते.
रॅपिड रिस्पॉन्स टीमची भूमिका महत्त्वाची
वाघाच्या बछड्यास बेशुद्ध करून ताब्यात घेण्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली आहे. या घटनेत या टीमचे समर्पण दिसून आले असून वन्यजीव प्रेमींनी या टीमचे कौतुक केले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे म्हणाले, आम्हाला माहिती मिळताच आमची चमू महत्त्वाची सामुग्री घेऊन ब्रह्मपुरीसाठी निघाली. बछडे ४० फूट खोल कॅनलमध्ये बसलेले होते. आम्ही खाली उतरून त्याची पाहणी केली. शारीरिक कमजोरीमुळे हे बछडे हालचाल करू शकत नव्हते. पूर्वानुभवानुसार आम्ही औषधांचा डोज घेऊन डार्ट मारला. त्यानंतर या बछड्यास ४० फूट खोल कॅनलमधून बाहेर काढले. त्यानंतर या बछड्यास उपचारासाठी गोरेवाडा प्राणिसंग्रहालय आणि रेस्क्यू सेंटरमध्ये पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी सकाळी या बछड्यास नागपूरला आणण्यात आले. यात रॅपिड रिस्पॉन्स टीमचे अजय मराठे, अमोल ताजने, राहुल धनविजय, श्रीराम आडे, सुरज बोंडे आणि सदस्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.

Web Title: The brave attempt to capture the six-month tiger cub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.