नागपुरात वधुपित्याच्या घरी धाडसी चोरी : सव्वाचार लाखांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 09:39 PM2018-12-24T21:39:54+5:302018-12-24T21:45:19+5:30

मुलीच्या लग्नासाठी घरात आणून ठेवलेली सव्वाचार लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. शंकरनगर पार्कजवळ राहणारे गोपीनाथन शिवशंकर नायर (वय ५८) यांच्या निवासस्थानी २२ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान ही धाडसी चोरीची घटना घडली. विशेष म्हणजे, चोरट्याने त्याच ठिकाणी असलेल्या अन्य दागिन्यांना हातही लावला नाही. दुसरे म्हणजे, नायर यांच्याकडे येत्या ३० डिसेंबरला मुलीचा लग्नसोहळा आहे. त्यामुळे त्यांची लगीनघाई सुरू असताना ही घटना घडल्याने लग्नाच्या आनंदावर विरजण पडले आहे.

Brave theft in bridefather's house at Nagpur: worth of Rs 4.25 lakhs jewelery stolen | नागपुरात वधुपित्याच्या घरी धाडसी चोरी : सव्वाचार लाखांचे दागिने लंपास

नागपुरात वधुपित्याच्या घरी धाडसी चोरी : सव्वाचार लाखांचे दागिने लंपास

googlenewsNext
ठळक मुद्देबजाजनगरातील घटना :लग्नाच्या आनंदावर विरजण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलीच्या लग्नासाठी घरात आणून ठेवलेली सव्वाचार लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. शंकरनगर पार्कजवळ राहणारे गोपीनाथन शिवशंकर नायर (वय ५८) यांच्या निवासस्थानी २२ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान ही धाडसी चोरीची घटना घडली. विशेष म्हणजे, चोरट्याने त्याच ठिकाणी असलेल्या अन्य दागिन्यांना हातही लावला नाही. दुसरे म्हणजे, नायर यांच्याकडे येत्या ३० डिसेंबरला मुलीचा लग्नसोहळा आहे. त्यामुळे त्यांची लगीनघाई सुरू असताना ही घटना घडल्याने लग्नाच्या आनंदावर विरजण पडले आहे.
नायर यांची कन्सल्टन्सी आहे. त्यांचे दोन माळ्यांचे निवासस्थान असून, ते वरच्या माळ्यावर राहतात. ३० डिसेंबरला त्यांच्या मुलीचे लग्न आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून त्यांनी दागिने व अन्य चीजवस्तूंची खरेदी तसेच जुळवाजुळव चालवली आहे. २२ नोव्हेंबरला त्यांनी बँकेच्या लॉकरमधून सोन्याचे दागिने काढून घरी आणले. रात्री १० वाजता त्यांनी ते दागिने आपल्या शयनकक्षातील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवले. त्याला कुलूपही लावले. १६ डिसेंबरला त्यांना राणी कोठीमधील एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी सहपरिवार जायचे होते. त्यामुळे त्यांनी कपाटातील दागिने काढण्यासाठी ड्रॉवरचे कुलूप उघडले. अनेक दागिन्यांचे पाऊच, डबे व्यवस्थित होते. मात्र, ४ लाख, २० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या त्यात दिसल्या नाही. त्यांनी परिवारातील सदस्यांना याबाबत विचारणा केली. मात्र, कुणीच त्याबद्दल काही सांगितले नाही. तीन दिवस विचार केल्यानंतर त्यांनी १९ डिसेंबरला अंबाझरी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून चौकशी केली. नायर यांचे निवासस्थान बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी ‘झीरो क्राईमी’नुसार नोंद करून प्रकरण चौकशीसाठी रविवारी बजाजनगर पोलिसांना पाठवले.
ज्याचा धाक होता, तेच झाले !
नायर यांनी चोरीच्या धाकाने खबरदारीचा उपाय म्हणून दागिने, रोकड आणि मौल्यवान चीजवस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवल्या होत्या. लग्नसमारंभाच्या निमित्ताने त्यांनी दागिने बँकेच्या लॉकरमधून घरी आणले आणि घरातूनच ते चोरीला गेले. विशेष म्हणजे, कोणताही कडी-कोंडा किंवा कुलूप तोडण्यात आले नाही. ड्रॉवरच्या चावीचा वापर करूनच ते दागिने चोरले गेले. दुसरे म्हणजे, त्याच ठिकाणी असलेले अन्य दागिने जसेच्या तसे ठेवून नेमक्या सोन्याच्या बांगड्या चोरण्यात आल्या. त्यामुळे नायर यांच्या निवासस्थानी संपर्क असलेल्यांपैकीच कुणी तरी ही चोरी केली असावी, असा संशय आहे.

Web Title: Brave theft in bridefather's house at Nagpur: worth of Rs 4.25 lakhs jewelery stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.