ओटे तोडून फूटपाथ मोकळे केले
By admin | Published: September 22, 2016 03:12 AM2016-09-22T03:12:33+5:302016-09-22T03:12:33+5:30
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी मध्यवर्ती रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागातील गेट ते कॉटन मार्केट चौक या मार्गावरील
कॉटन माकर् ेट भागात कारवाई : ३५ अतिक्रमण हटविले
नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी मध्यवर्ती रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागातील गेट ते कॉटन मार्केट चौक या मार्गावरील हॉटेल चालक व दुकानदारांनी केलेले अतिक्रमण, बांधलेले ओटे तोडून फूटपाथ मोकळे केले. या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले.
फूटपाथवर अतिक्रमण करून दुकाने थाटली होती. यामुळे या मार्गावरील वाहतुकीला बाधा निर्माण झाली होती. यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेत पथकाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.
मार्गावरील दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांनीही बांधलेले ओटे हटविण्यात आले. तसेच टीनाचे शेड, पानठेले आदी हटविण्यात आले. काही ठेलेधारकांनी कारवाईला विरोध दर्शविला. त्यांचे पाच ठेले जप्त करण्यात आले.
दुसऱ्यांदा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. ही क ारवाई अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, धंतोली झोनचे नरेंद्र भंडारकर, गणेशपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण, जमशेट अली, मंजू शाह, शरद इरपाते आदींनी केली. (प्रतिनिधी)