धुक्यामुळे रेल्वेच्या गतीला ब्रेक! १९ गाड्यांचे वेळापत्रक बिघडले, प्रवाशांना नाहक मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 11:21 PM2024-01-11T23:21:47+5:302024-01-11T23:22:01+5:30
उत्तर भारतातून येणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेगाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे.
नागपूर : धुक्यांची चादर गडद झाल्यामुळे विविध भागातून, खास करून उत्तर भारतातून येणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेगाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. गुरुवारी अशाच प्रकारे नागपूर मार्गे धावणाऱ्या १९गाड्या विलंबाने नागपुरात पोहचल्या आहेत. यामुळे प्रवाशांचेही वेळापत्रक गडबडले असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
विलंबाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांपैकी १६०३२ एपी एक्सप्रेस २.५० तास उशिरा, १२५८९ गोरखपूर सिकंदराबाद एक्सप्रेस १२ तास, १२७२४ नवी दिल्ली हैदराबाद तलंगणा एक्सप्रेस ४ तास, १२२६१ सीएसएमटी हावडा दुरंतो एक्सप्रेस ६.४५ तास, १२८६० हावडा सीएसएमटी गीतांजली एक्सप्रेस २ तास, २२६९२ निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस २ तास, १२७२१ हैदराबाद निजामुद्दीन दक्षिण एक्सप्रेस ५.४५ तास, १२६१६ निजामुद्दीन जीटी एक्सप्रेस २.२० तास, २०८०६ नवी दिल्ली विशाखापट्टनम एक्सप्रेस ३.३० तास, १२४०९ गोंडवाना एक्सप्रेस ४.४५ तास आणि १२६२६ केरला एक्सप्रेस १२ घंटे उशिरा धावत असल्याचे वृत्त आहे.