नागपुरातील ३७२ इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:42 PM2018-08-16T22:42:59+5:302018-08-16T22:43:57+5:30

महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना कायद्याचे काटेकोर पालन झाले पाहिजे. नोटीस बजावल्यानंतरही आग प्रतिबंधक उपाययोजना न करणाऱ्या ३७२ इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी गुरुवारी महापालिका मुख्यालयात आयोजित समन्वय समितीच्या बैठकीत दिले.

Break water and electricity supply of 372 buildings in Nagpur |  नागपुरातील ३७२ इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित करा

 नागपुरातील ३७२ इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित करा

Next
ठळक मुद्देआयुक्त वीरेंद्र सिंह यांचे निर्देश : अग्निशमन नियमांचे पालन न करणाऱ्या इमारतींवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना कायद्याचे काटेकोर पालन झाले पाहिजे. नोटीस बजावल्यानंतरही आग प्रतिबंधक उपाययोजना न करणाऱ्या ३७२ इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी गुरुवारी महापालिका मुख्यालयात आयोजित समन्वय समितीच्या बैठकीत दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (साप्रवि) महेश धामेचा, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप कार्यकारी अभियंता डी.डी. जांभुळकर यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
अग्निशमन व आणीबाणी विभागातर्फे शहरातील ७८२ इमारतधारक व भोगवटदारांना आग प्रतिबंधक उपाययोजना नसल्याने नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र त्यापैकी ३७२ इमारतींनी अद्यापही काही उपाययोजना न केल्याने अशा इमारतीमधील पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश आयुक्तांनी जलप्रदाय विभाग, ओसीडब्ल्यू व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ, एसएनडीएल च्या अधिकाऱ्यांना दिले.
कळमना परिसरातील रेल्वेची सुरक्षा भिंत तुटल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या इमारतीचे बांधकाम व ट्रॅकवरील स्वच्छतेबाबत त्वरित कारवाई करा, नागरिकांनी ये-जा करण्यासाठी कळमना ते नागपूर ट्रॅक लगतच्या भिंतीला भगदाड पाडले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ते पुन्हा पूर्ववत करण्यासाठी ४५ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. यासंबंधीच्या अंदाजपत्रकाची प्रत मनपा आयुक्त कार्यालयाकडे पाठवून त्वरित कामाला सुरुवात करावी, असे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी निर्देशित केले.
समन्वय बैठक विकास कामांच्या दृष्टीने आणि नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यामुळे या बैठकीला सर्व विभागप्रमुखांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले.

खोदकामाची प्रकरणे निकाली काढा
महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यावर खोदकाम करताना महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्याशिवाय रस्त्यांचे खोदकाम करणाºया विभागांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच रस्ते खोदकामासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासची सुद्धा परवानगी घेऊन त्या संबंधी रीतसर पत्र सादर करण्यात यावे. याशिवाय रस्ते खोदकामासंर्भातील सर्व प्रकरणे येत्या शनिवारपर्यंत निकाली काढण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Web Title: Break water and electricity supply of 372 buildings in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.