स्तन कॅन्सर वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:35 AM2017-10-22T01:35:15+5:302017-10-22T01:35:27+5:30

आॅक्टोबर महिना हा स्तन कॅन्सर जागृती महिना म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर कॅन्सर रुग्णांची अधिक माहिती घेतली असता स्तन कॅन्सर रुग्णांच्या बाबतीत देशभरात नागपूर शहर तिसºया क्रमांकावर आहे.

Breast cancer is growing | स्तन कॅन्सर वाढतोय

स्तन कॅन्सर वाढतोय

Next
ठळक मुद्देजनजागृती महिना : महिलांसोबतच पुरुषही पीडित, देशभरात नागपूर तिसºया क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आॅक्टोबर महिना हा स्तन कॅन्सर जागृती महिना म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर कॅन्सर रुग्णांची अधिक माहिती घेतली असता स्तन कॅन्सर रुग्णांच्या बाबतीत देशभरात नागपूर शहर तिसºया क्रमांकावर आहे. महिलांसोबतच आता पुरुषांतही स्तन कॅन्सर आढळून येत आहे.
अन्न नलिका व तोंडाचा कॅन्सर याबाबतीत नागपूर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. शहरात दरवर्षी दहा हजार कॅन्सर रुग्णांची नोंद केली जाते. सध्या नागपूर शहरात कॅन्सरचे १२ हजार रुग्ण आहेत. नागपुरात दरवर्षी नवीन ५ हजार लोकांना कॅन्सरची लागण होत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने मेडिकल सोबतच खासगी रुग्णांलयातही कॅन्सरच्या रु ग्णांची संख्या वाढत आहे.
रुग्णांच्या संख्येत वाढ
जीवनमानातील बदल व हार्मोन्सच्या बदलामुळे महिलांमध्ये ३५ वर्षात तर पुरुषांना वयाच्या ४५ वर्षानंतर स्तन कॅन्सर आढळून येत आहे. इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या संशोधनानुसार २०२० पर्यंत नवीन १७ लाख लोकांना कॅन्सर होईल. देशात गेल्या १६ वर्षात स्तन कॅन्सरच्या रुग्णांची संख्या ५० टक्यांनी वाढली आहे. २००१ मध्ये स्तन कॅन्सरचे ७,९७,६५७ रुग्ण आढळले होते. तर २०१६ मध्ये १२,१९,६४९ रु ग्ण आढळून आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विभागीय कॅन्सर रुग्णालय व अनुसंधान केंद्राकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २८ टक्के महिला स्तन कॅन्सरने पीडित असल्याचे आढळून आले आहे. तसेच पुरुषांमध्येही स्तन कॅन्सरचे रुग्ण आढळून येत आहेत.
पुरुषांच्या कॅन्सरमध्ये नागपूर प्रथम
राज्यात पुरुषांच्या कॅन्सरमध्ये नागपूर पहिल्या क्रमांकावर आहे. ८० वयोगटातील नागपुरात ८८.६ टक्के रुग्ण आहे. यात मुंबईत ८४ टक्के, पुणे ८१.१ टक्के तर औरंगाबादमध्ये ४२ टक्के रुग्ण आढळून आले आहे. महिलांच्या कॅन्सरमध्ये नागपूर पहिल्या क्रमांकावर आहे. ८० वर्षापर्यंत ८०.२ टक्के रुग्ण आढळून आले आहे. दुसºया क्रमांकावरील मुंबई शहरात ६८.१ टक्के, पुणे ६७.२ तर औरंगाबाद शहरात ३७.७ टक्के महिला पीडित आहे.
स्तन कॅन्सर होण्याची कारणे
राहणीमानातील बदल, हार्मोन्समध्ये बदल, मेनोपॉज, उशिरा लग्न होणे, उशिराने मातृत्व, स्तनपान न करणे आदी कारणांमुळे स्तन कॅन्सर होण्याचा धोका असतो. पुरुषात हार्मोन्समधील बदलामुळे कॅन्सर होत आहे.रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय : ३५ वर्षाच्या महिलांत स्तन कॅन्सरच्या बाबतीत देशात पहिला क्रमांक मुंबई शहराचा, दुसरा दिल्ली तर तिसºया क्रमांकावर नागपूर आहे. देशातील महानगरातील कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
- डॉ. बी.के.शर्मा,
सहसंचालक, राष्ट्रसंत तुकडोजी
विभागीय कॅन्सर हॉस्पिटल

Web Title: Breast cancer is growing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.