तरुण वयात ब्रेस्ट कॅन्सर मृत्यूचा धोका ४९ टक्के : सुशील मानधनिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:27 AM2019-10-04T00:27:01+5:302019-10-04T00:29:45+5:30

आता ३० ते ४० वर्षे वयोगटातील महिलांमध्येही हा रोग दिसून येऊ लागला आहे. विशेष म्हणजे, या वयात हार्माेन उग्र राहत असल्याने कर्करोग झपाट्याने पसरून मृत्यूचा धोका ४९ टक्क्याने वाढला आहे.

Breast cancer mortality at young age stands at 49 percent: Sushil Mandhania | तरुण वयात ब्रेस्ट कॅन्सर मृत्यूचा धोका ४९ टक्के : सुशील मानधनिया

तरुण वयात ब्रेस्ट कॅन्सर मृत्यूचा धोका ४९ टक्के : सुशील मानधनिया

Next
ठळक मुद्देदरवर्षी एक लाख ४५ हजार नवे रुग्णस्तन कर्करोग जनजागृती महिना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्वी वाढत्या वयासोबत स्तनाच्या कर्करोगाची जोखीम वाढायची. आता ३० ते ४० वर्षे वयोगटातील महिलांमध्येही हा रोग दिसून येऊ लागला आहे. विशेष म्हणजे, या वयात हार्माेन उग्र राहत असल्याने कर्करोग झपाट्याने पसरून मृत्यूचा धोका ४९ टक्क्याने वाढला आहे. यामुळे प्रत्येक महिलेने स्तन कर्करोगाच्या लक्षणांची माहिती जाणून घेणे, स्वत: स्तन तपासणी करणे व शंका वाटल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे मत कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी व्यक्त केले.
स्तन कर्करोग जनजागृती महिनानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत डॉ. मानधनिया यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, जगात दरवर्षी स्तन कर्करोगाचे(ब्रेस्ट कॅन्सर) सुमारे १६ लाख ७० हजार नवे रुग्ण आढळून येतात. यातील ५ लाख २१ हजार रुग्णांचा मृत्यू होतो. भारतात दरवर्षी १ लाख ४५ हजार नवे रुग्ण आढळून येतात यातील ९२ हजार रुग्णांचा मृत्यू होतो. ही आकडेवारी धक्कादायक आहे.
२२ मधून एका महिलेला स्तन कर्करोग
डॉ. मानधनिया म्हणाले, अभ्यासात असे समोर आले की, भारतात २२ मधून एक महिलेला स्तनाचा कर्करोग आढळून येतो, तर ‘युएसए’मध्ये आठमधून एक महिलेला हा कर्करोग आढळतो. साधारण पन्नाशीनंतर स्तनाच्या कर्करोगाच्या विळख्यात सापडणाऱ्या महिला आता तिशीच्या आसपासच कर्करोगाला बळी पडत आहेत. प्रामुख्याने, बदललेली जीवनशैली हे यामागचे मुख्य कारण आहे. सुमारे ५ टक्के रुग्णांना हा कर्करोग अनुवंंशिकतेने होतो.
अनुवंशिक सोबतच इतरही कारणे
डॉ. मानधनिया म्हणाले, स्तनाचा कर्करोग अनुवंशिक सोबतच इतरही कारणांमुळे होतो. यात मुख्य कारण म्हणजे स्त्रियांमधील संप्रेरक अर्थात ‘इस्ट्रोजेन’ स्रवण्यास निर्माण झालेली बाधा. लहान वयात पाळी येणे, उशिरा रजोनिवृत्ती तसेच मुल न होऊ देण्यासारख्या कारणांमुळे महिलांचे शरीर इस्ट्रोजेनच्या दुष्परिणामांकडे ओढले जाते. चुकीची आहारपद्धती व एका जागी बसून काम करणे, धुम्रपान व मद्यपानही याला कारणीभूत ठरते.
नागपुरात ११ हजारावर रुग्ण
२०१० ते २०१४ च्या शासन अहवालावरून नागपुरात सर्व कर्करोगाचे ११ हजार ७०० रुग्ण आहेत. यात पुरुषांची संख्या ५७७० तर महिलांची संख्या ५९३० आहे. कर्करोगाच्या रुग्णांची नोंदणी होत नसल्याने हा आजार आणखी धोकादायक ठरत असल्याचेही डॉ. मानधनिया म्हणाले.

Web Title: Breast cancer mortality at young age stands at 49 percent: Sushil Mandhania

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.