आईचे दुध हेच बाळाचे अमृत : दुग्धवृद्धीजन्य पदार्थांचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:36 AM2019-08-03T00:36:48+5:302019-08-03T00:39:24+5:30

प्रसुतीनंतर आईचे दूध हे बाळाच्या आणि आईच्याही आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे आहारात मोठ्या प्रमाणात बदल झाले असून महिलांमध्ये स्तनपानाच्या समस्या निर्माण होताना दिसत आहेत. त्यामुळे जगभरात या विषयावर जनजागृतीसाठी १ ते ७ ऑगस्ट यादरम्यान स्तनपान सप्ताह पाळला जातो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले परिसरात गृहविज्ञान विभागातर्फे विशेष प्रदर्शनासह स्तनपान सप्ताह साजरा केला जात आहे.

Breast milk is the baby's nectar: display milk increase products | आईचे दुध हेच बाळाचे अमृत : दुग्धवृद्धीजन्य पदार्थांचे प्रदर्शन

आईचे दुध हेच बाळाचे अमृत : दुग्धवृद्धीजन्य पदार्थांचे प्रदर्शन

Next
ठळक मुद्देविद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागात स्तनपान सप्ताह

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : प्रसुतीनंतर आईचे दूध हे बाळाच्या आणि आईच्याही आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे आहारात मोठ्या प्रमाणात बदल झाले असून महिलांमध्ये स्तनपानाच्या समस्या निर्माण होताना दिसत आहेत. त्यामुळे जगभरात या विषयावर जनजागृतीसाठी १ ते ७ ऑगस्ट यादरम्यान स्तनपान सप्ताह पाळला जातो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले परिसरात गृहविज्ञान विभागातर्फे विशेष प्रदर्शनासह स्तनपान सप्ताह साजरा केला जात आहे. 
आईच्या दुग्धवृद्धीसाठी मेथ्या, शेवग्यांची पाने, जवस, काळे तिळ, खोबरे, खजुर, ओट्स, सोप, आदरक, आळीव, तुळस, विड्याची पाने, खसखस, कोहळ्याच्या बिया, कच्ची पपई, जव, बदाम, खाण्याचा डिंक आदी घटकांचा समावेश आवश्यक आहे. विभागाच्या विद्यार्थिनींनी या घटकांपासून तयार केलेले उपमा, लाडु, बर्फी, शंकरपाळे, पराठे, लवट, पॅनकेक, खीर, खापसी, चिक्की, चकली, चिवडा अशा १५० पेक्षा अधिक रेसीपींचे प्रदर्शन लावले आहे. गृहविज्ञान विभागातील २५ विद्यार्थिनींनी यात सहभाग नोंदविला. स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विविध पौष्टिक पदार्थांची माहिती व्हावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. संकल्पना विभागप्रमुख डॉ. कल्पना जाधव यांची होती तर समन्वयिका डॉ. प्राजक्ता नांदे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. एलआयटी महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापक प्रतिमा शास्त्री यांनी प्रदर्शनाला भेट दिली. कॅम्पसमधील विविध विभागाचे विद्यार्थी, प्राध्यापक वृंद यांच्यासह एलईडी कॉलेज धरमपेठ, येथील विद्यार्थिनींनी प्रदर्शनाला भेट देऊन, पदार्थांची माहिती जाणून घेतली. प्रत्येक पदार्थाची रेसिपी आणि तयार केलेला पदार्थ प्रदर्शनात ठेवण्यात आला होता. यासह पदार्थाच्या सेवनामुळे, स्त्रियांच्या शरीराला कोणते घटक मिळतील आणि ते किती प्रमाणात प्रथिने पुरवतील याची सविस्तर माहिती प्रदर्शनात सादर करण्यात आली होती.

Web Title: Breast milk is the baby's nectar: display milk increase products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.