चिमुकल्यांसाठी स्तनपान वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:13 AM2021-08-14T04:13:05+5:302021-08-14T04:13:05+5:30
गुमगाव : चिमुकल्यांच्या निकोप वाढीसाठी मातेचे दूध अत्यंत गरजेचे असते. त्यात बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक सर्व प्रकारचे अन्नघटक असतात. ...
गुमगाव : चिमुकल्यांच्या निकोप वाढीसाठी मातेचे दूध अत्यंत गरजेचे असते. त्यात बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक सर्व प्रकारचे अन्नघटक असतात. त्यामुळे स्तनपान हेच चिमुकल्यांसाठी वरदान असते, असे प्रतिपादन पर्यवेक्षिका सोनाली आष्टनकर यांनी किन्हाळा (ता. हिंगणा) येथील अंगणवाडीमध्ये आयाेजित कार्यक्रमात केले.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा योजना हिंगणाअंतर्गत गुमगाव बीटमधील २५ गावांमधील अंगणवाड्यांमध्ये एकाच वेळी स्तनपान सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. यात मातांना स्तनपानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच प्रवीणा शेळके, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी कैकाडे, पद्मा टेंभरे, कल्पना धांडे, ममता बर्वे, गोदावरी नागपुरे, रजनी बेलेकर, पंचफुला रहांगडाले, प्रमिला मेश्राम आदी उपस्थित होत्या. स्तनदा मातांच्या हस्ते वृक्षारोपण करून राेपट्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्यात आली. संचालन अंगणवाडी सेविका कविता सेलकर यांनी केले तर, पुष्पा मसराम यांनी आभार मानले. कार्यक्रमात माता आपल्या बाळांसह माेठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.