भरधाव बाईकने घेतला जीव
By admin | Published: February 26, 2016 02:56 AM2016-02-26T02:56:20+5:302016-02-26T02:56:20+5:30
सेंट्रल एव्हेन्यूवरील वाहतूक पोलीस कार्यालयासमोर भरधाव वेगाने जात असलेल्या दोन बाईक एकमेकांना धडकल्या.
तीन मित्रही गंभीर : वाहतूक कार्यालयासमोर अपघात
नागपूर : सेंट्रल एव्हेन्यूवरील वाहतूक पोलीस कार्यालयासमोर भरधाव वेगाने जात असलेल्या दोन बाईक एकमेकांना धडकल्या. यात एका जीम ट्रेनरचा मृत्यू झाला तर अन्य तीन युवक जखमी झाले. सायंकाळी ४.१५ वाजता हा अपघात घडला. पुनित राजेन दुबे (२८) असे मृताचे नाव आहे. तर प्रदीप प्रल्हाद मिश्रा (३३), विजय छोटेलाल मिश्रा (३३) आणि रोहित प्रल्हाद मिश्रा (२३) अशी जखमींची नावे आहेत. सर्व सेमिनरी हिल्स, सुरेंद्र गड येथील रहिवासी आहेत. एकाच परिसरातील राहणारे असल्याने चौघांमध्ये चांगली मैत्री आहे. मिळालेल्या माहितीनुसार चौघांनीही दुपारी काटोल रोडवरील एका बारमध्ये पार्टी केली. तेथून दोन बाईकवर स्वार होऊन ते निघाले. विजयचा इतवारी रेल्वे स्टेशनवर खानपान सामग्रीचा ठेका आहे. एका बाईकवर पुनित आणि प्रदीप तर दुसऱ्या बाईकवर विजय आणि रोहित स्वार होते. पुनित बाईक चालवत होता. प्रत्यक्षदर्शीनुसार मेयो रुग्णालय चौकातून गीतांजली चौकाच्या दिशेने जात असताना सेवासदन चौकात दोन्ही बाईक समानांतर चालत असतांना अचानक एकमेकांना धडकल्या. ही धडक इतकी जबरदस्त होती की चौघेही बाईकवरून उडून दूर जाऊन पडले.