लाचखोर प्रकरण :  देहव्यापार सूत्रधार निघाला ‘पोलिसाचा पंटर’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:32 AM2019-04-25T00:32:10+5:302019-04-25T00:32:52+5:30

पोलिसांकडे सेटिंग करण्याची बतावणी करून १५ हजार रुपयांची लाच घेताना आणि एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला रजत ठाकूर देहव्यापाराचा सूत्रधार समजला जात आहे. तो देहव्यापाराच्या प्रकरणात जामिनावर सुटला आहे. रजत एसीबीच्या चमूसमोरच फरार झाल्यामुळे या प्रकरणाशी जुळलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांचे त्याला पाठबळ असल्याच्या शंकेला बळ मिळाले आहे.

Bribery Case: Sex racketeer turned ' Police Panter' | लाचखोर प्रकरण :  देहव्यापार सूत्रधार निघाला ‘पोलिसाचा पंटर’ 

लाचखोर प्रकरण :  देहव्यापार सूत्रधार निघाला ‘पोलिसाचा पंटर’ 

Next
ठळक मुद्देसीआरपीएफमध्ये निलंबित, पोलीस अधिकारी आहेत नातेवाईक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांकडे सेटिंग करण्याची बतावणी करून १५ हजार रुपयांची लाच घेताना आणि एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला रजत ठाकूर देहव्यापाराचा सूत्रधार समजला जात आहे. तो देहव्यापाराच्या प्रकरणात जामिनावर सुटला आहे. रजत एसीबीच्या चमूसमोरच फरार झाल्यामुळे या प्रकरणाशी जुळलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांचे त्याला पाठबळ असल्याच्या शंकेला बळ मिळाले आहे.
रजतने देहव्यापार प्रकरणात लिप्त असलेल्या आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे सांगून सामाजिक सुरक्षा दलाच्या एका कर्मचाऱ्याच्या नावावर ५० हजार रुपये मागितले होते. आरोपीच्या पत्नीने याची तक्रार एसीबीकडे केली होती. त्या आधारावर मंगळवारी सायंकाळी चिल्ड्रेन पार्कजवळ रजतला रंगेहात पकडले होते. गुन्ह्याची नोंद करण्यासाठी सीताबर्डी ठाण्यात आणताना तो एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता. २४ तासानंतरही रजतचा ठावठिकाणा लागलेला नाही. प्रारंभी रजतला पोलिसाचा पंटर असल्याचे सांगितले होते, पण बारकाईने चौकशी केली असता तो देहव्यापारात लिप्त असल्याचे आढळून आले.
बजाजनगर पोलिसांनी ९ मार्चला परांजपेनगर येथील आशिष टॉवरमध्ये धाड टाकून रजत आणि विक्की खोब्रागडेला अटक केली होती. त्या ठिकाणी दोन तरुणी मिळाल्या होत्या. या अड्ड्याचा सूत्रधार बालाघाट निवासी स्वप्निल गुप्ता होता. तो पोलिसांना सापडला नव्हता. त्याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणात पोलिसांकडून विरोध होऊ नये आणि देहव्यापाराला संरक्षण मिळवून देण्याचे सांगून रजत त्याला पैसे मागू लागला. रजत सीआरपीएफमध्ये शिपाई होता. ड्युटीवर अनुपस्थित राहिल्याच्या कारणामुळे त्याला दोन वर्षांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तो बेरोजगार होता. या दरम्यान तो गुप्तासोबत देहव्यापारात जुळला. त्याला गुप्तासोबत सीताबर्डी परिसरात देहव्यापार करताना अटक करण्यात आली होती.
रजतचे पोलिसांसोबत घनिष्ट नाते आहे. त्याचे सासरे पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे तो नेहमीच पोलिसांच्या संपर्कात असतो. सूत्रांच्या माहितीनुसार ९ मार्चला बजाजनगर पोलिसांनी त्याला अटक केली, तेव्हा पोलीस विभागातील अनेकजण त्याच्या बचावासाठी पुढे आले होते. बजाजनगर ठाण्यातील मास्टरमाईंड सचिनच्या माध्यमातून रजतला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सचिन अयशस्वी ठरल्यानंतर गुन्हे शाखेतील काही चर्चित अधिकारी आणि कर्मचारी सक्रिय झाले होते. पण बजाजनगर पोलिसांपुढे कुणाचीही डाळ शिजली नाही. हे पाहून रजतने स्वत:चे नाव रुपेश गौतम ठाकूर सांगितले होते.

Web Title: Bribery Case: Sex racketeer turned ' Police Panter'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.