वधू मंडपी हाणामारी, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:08 AM2021-03-22T04:08:58+5:302021-03-22T04:08:58+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : वधू मंडपी क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यात गंभीर दुखापत झालेल्या एकाचा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : वधू मंडपी क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यात गंभीर दुखापत झालेल्या एकाचा मृत्यू झाला, तर दाेघे गंभीर जखमी झाले. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पाहमी येथे रविवारी (दि. २१) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. यात कुणी कुणाला कशासाठी मारहाण केली, हे मात्र कळू शकले नाही.
अश्विन नरेश टेंभरे (३५, रा. नागपूर) असे मृताचे तर समीर डहाके (२२) व त्याचे वडील वामन डहाके दाेघेही रा.पाहमी, ता.भिवापूर अशी गंभीर जखमींची नावे आहेत. पंजाब पिल्लेवान, रा.पाहमी (चिचाळा) यांच्या मुलीचा विवाह साेहळा विशाल भारशंकर, रा.वडधामणा, नागपूर याच्याशी रविवारी पाहमी येथे पार पडला. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास जेवणाच्या पंगतीमध्ये किरकाेळ कारणावरून भांडणाला सुरुवात झाली. दाेन्ही पक्षांकडील ज्येष्ठांनी मध्यस्थी करून ते भांडण मिटविले हाेते.
काही वेळाने पुन्हा भांडणाला सुरुवात झाली. यात अश्विन, समीर व वामन तिघे गंभीर जखमी झाले. अश्विनला लगेच उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्याला नागपूरला हलविण्यात आले. मात्र, त्याचा वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. घटनेच्या वेळी समीर पंगतीत जेवण करीत असताना दारू प्यायलेला एक जण त्याच्या अंगावर पडला. हा वाद साेडविण्यासाठी त्याचे वडील गेले असता, कुणीतरी त्यांना वीट फेकून मारली. त्या दाेघांवर भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दाेन्ही पक्षांकडील सदस्यांनी रात्री भिवापूर पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली. वृत्त लिहिस्ताेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.