खुबाळा, नंदापूर येथील पूल धाेकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:07 AM2021-07-24T04:07:28+5:302021-07-24T04:07:28+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : खुबाळा व नंदापूर (ता. सावनेर) गावालगत असलेल्या नाल्यावर पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : खुबाळा व नंदापूर (ता. सावनेर) गावालगत असलेल्या नाल्यावर पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. या पुलांची उंची कमी असल्याने मध्यम स्वरुपाचा पाऊस काेसळताच नाल्याला पूर येतो आणि पुराचे पाणी पुलावरून वाहते. त्यामुळे हा पूल धाेकादायक ठरत आहे. या प्रकारामुळे गावाचा संपर्क तुटत असून, नागरिकांना पूर ओसरेपर्यंत ताटकळत रहावे लागते.
खुबाळा (ता. सावनेर) गावालगतच्या नाल्यात जंगल व शिवारातील पावसाचे पाणी वाहात येत असल्यााने मध्यम स्वरुपाचा पाऊस काेसळताच या नाल्याला पूर येताे. या नाल्यावर असलेल्या पुलाची उंची फारच कमी आहे. पुराचे पाणी पुलावरून वाहात असल्याने शेतकरी व मजुरांना काठावर ताटकळत रहावे लागते. ही स्थिती नंदापूर येथील नाल्याची व तेथील शेतकऱ्यांची आहे. या दाेन्ही पुलांचा वापर शेतीच्या वहिवाटीसाठी केला जाताे.
नंदापूूर शिवारातील पूल गळेगाव-अजनी राेडवर असून, हा राेड सावनेर शहराला जाेडला आहे. त्यामुळे या नाल्याच्या पुराचा शेतकऱ्यांसाेबतच इतर नागरिकांनाही फटका बसताे. विशेष म्हणजे, या पुलाचे बांधकाम काेच्छी बॅरेजचे काम करणाऱ्या साई कन्स्ट्रक्शन नामक कंपनीने केले आहे. ही समस्या दरवर्षी उद्भवत असल्याने ती साेडविण्यासाठी या दाेन्ही ठिकाणी उंच पुलांचे बांधकाम करावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह नागरिकांनी केली आहे.
...
संरक्षक कठड्यांचा अभाव
या दाेन्ही पुलांना संरक्षक कठडे नाही. या नाल्यातील पाण्याचा प्रवाह वेगात वाहात असल्याने तसेच त्यांना संरक्षक कठडे नसल्याने ते धाेकादायक ठरत आहेत. गुरुवारी (दि. २२) काेसळलेल्या पावसामुळे या दाेन्ही पुलांजवळ शेतकऱ्यांसह मजूर व त्यांच्याकडील गुरांना पूर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. या पुलांची उंची वाढविण्याची वारंवार मागणी करूनही स्थानिक लाेकप्रतिनिधी व अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
230721\img_20210722_135952.jpg
नाल्यावरील पुलाचे फोटो